मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

25 वर्षानंतर लॉर्ड्सवर इतिहास घडला, या क्रिकेटपटूने केली गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी

25 वर्षानंतर लॉर्ड्सवर इतिहास घडला, या क्रिकेटपटूने केली गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी

न्यूझीलंडचा आक्रमक ओपनर डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने पदार्पणाच्या टेस्टमध्येच शतक केलं आहे. पदार्पणाच्या मॅचमध्येच शतक करणारा कॉनवे न्यूझीलंडचा 12 वा खेळाडू ठरला आहे.

  • Published by:  Shreyas
लंडन, 2 जून : न्यूझीलंडचा आक्रमक ओपनर डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने पदार्पणाच्या टेस्टमध्येच शतक केलं आहे. पदार्पणाच्या मॅचमध्येच शतक करणारा कॉनवे न्यूझीलंडचा 12 वा खेळाडू ठरला आहे. 163 बॉलमध्ये कॉनवेने आपलं शतक पूर्ण केलं. या शतकाबरोबरच कॉनवेने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) विक्रमाशी बरोबरी केली आहे. सौरव गांगुलीने 1996 साली लॉर्ड्सच्या मैदानातून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्याच सामन्यात गांगुलीने 131 रनची खेळी केली होती. लॉर्ड्सवरून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत शतक झळकावणारा कॉनवे तिसरा परदेशी खेळाडू ठरला. डेविड कॉनवेआधी राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनीही लॉर्ड्सवरून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. द्रविडने पहिल्याच सामन्यात 95 रन केले होते. तर न्यूझीलंडच्या वॉल्टर वॉलेसने 1937 साली लॉर्ड्सवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, त्यांनी 56 रनची खेळी केली होती. लॉर्ड्सवर पदार्पणातच शतकं सौरव गांगुली, मॅट प्रायर, एनड्रयू स्ट्राऊस, डेवॉन कॉनवे, एच. ग्रॅहम, जे. हॅम्पशायर यांनी लॉर्ड्सवर पदार्पणाच्या सामन्यात शतकं केलं होतं, पण यातले एच. ग्रॅहम गांगुली आणि कॉनवे हेच परदेशी खेळाडू आहेत, बाकीचे सगळे इंग्लंडकडून खेळले. कॉनवेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाका डेवॉन कॉनवेने सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाका केला आहे. न्यूझीलंडकडून खेळलेल्या 14 टी-20 मॅचमध्ये त्याने 59.12 च्या सरासरीने 473 रन केले. तर 3 वनडेमध्ये त्याने 75 च्या सरासरीने 225 रन ठोकले. कॉनवे अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन आहे, पण त्याची शैली एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे आहे. कॉनवे न्यूझीलंडकडून टी-20 मध्ये लागोपाठ 5 अर्धशतकं करणारा पहिला बॅट्समन आहे.
First published:

Tags: Cricket, Sourav ganguly

पुढील बातम्या