मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Sunil Gavaskar Birthday : .. तर क्रिकेटर नाही मासेमार बनले असते गावसकर! लिटल मास्टरची फिल्मी गोष्ट, VIDEO

Sunil Gavaskar Birthday : .. तर क्रिकेटर नाही मासेमार बनले असते गावसकर! लिटल मास्टरची फिल्मी गोष्ट, VIDEO

महान क्रिकेटपटू, लिटल मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा आज (10 जुलै) वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसांमध्येच ते हरवले होते. ही संपूर्ण गोष्ट फिल्मी आहे.

महान क्रिकेटपटू, लिटल मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा आज (10 जुलै) वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसांमध्येच ते हरवले होते. ही संपूर्ण गोष्ट फिल्मी आहे.

महान क्रिकेटपटू, लिटल मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा आज (10 जुलै) वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसांमध्येच ते हरवले होते. ही संपूर्ण गोष्ट फिल्मी आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 जुलै :  महान क्रिकेटपटू, लिटल मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा आज (10 जुलै) वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी मुंबईत झाला. गावसकरांनी वयाच्या 22 व्या वर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या काळातील सर्वात बलाढ्य टीमच्या विरुद्ध त्यांनी 4 टेस्टमध्ये 154 पेक्षा जास्त सरासरीने 774 रन केले. यामध्ये 4 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश होता. या मालिकेत त्यांनी एक द्विशतक देखील झळकावले. हा रेकॉर्ड आजही कायम आहे. कोणत्याही भारतीय बॅट्समनला आजवर एका मालिकेत इतके रन बनवता आलेले नाहीत.

गावसकरांची फिल्मी गोष्ट

सुनील गावसकरांच्या जन्मानंतर एक फिल्मी गोष्ट घडली. ते काही दिवसांचे असतानच हरवले होते. गावसकरांचा जन्म मुंबईच्या मेटर्निटी हॉस्पिटलमध्ये झाला. त्यावेळी दुसऱ्या एका मुलासबोत त्यांची अदलाबदल झाली. कोळी समाजातील एका महिलेकडं गावसकर गेले होते.गावसकरांनी स्वत: हा किस्सा ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ या कार्यक्रमात सांगितला आहे.

गावसकरांचे काका त्यांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्या ही चूक लक्षात आली आणि त्यांनी योग्य बाळाचा म्हणजे सुनील गावसकरांचा शोध घेतला. हॉस्पिटलमध्ये झालेली ही चूक गावसकरांच्या काकांनी वेळीच पकडली नसती तर गावसकर मासेमार बनले असते.

कसा लागला शोध?

गावसकर यांनी  स्वत: ही माहिती दिली आहे. ‘मला काकांनी पहिल्याच दिवशी पाहिले होते. त्यावेळी माझ्या कानात एक लहान छिद्र आहे, हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी ते पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये मला पाहण्यासाठी आले. माझी आई तेव्हा जनरल वॉर्डात होती. आईने काकांच्या हातात लहान मुल दिले. त्यावेळी त्या मुलाच्या कानात छिद्र नसल्याचं त्यांच्या लक्षात आले. हे आपले बाळ नाही, असे काकांनी आईला सांगितले.

" isDesktop="true" id="577305" >

त्यानंतर हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला. हॉस्पिटलमध्ये लहान बाळाची शोधाशोध सुरु झाली. अखेर एका कोळी समाजातील महिलेच्या जवळ कानात छिद्र असलेलं लहान बाळ सापडले. बाळाला आंघोळ घालताना हॉस्पिटलच्या नर्सच्या हातून ही चूक घडली होती. ही चूक वेळीच लक्षात आली नसती तर मी आज काही तरी वेगळाच असतो,’ असा अनुभव गावसकरांनी सांगितला आहे.

WI vs AUS : 5 ओव्हरमध्ये गडगडली ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजचा पहिल्या सामन्यात विजय

टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करणारे गावसकर हे पहिले बॅट्समन होते. त्यांनी 1987 साली पाकिस्तान विरुद्ध हा पराक्रम केला. 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत गावसकरांनी अनेक रेकॉर्ड नोंदवले.

First published:

Tags: Cricket, On this Day, Sunil gavaskar