मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /श्रीलंकेच्या क्रिकेटपटूला कोरोना होऊनही मालिकेबाबत घेतला 'हा' निर्णय

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूला कोरोना होऊनही मालिकेबाबत घेतला 'हा' निर्णय

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या वन-डे पूर्वी श्रीलंकेच्या टीममध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. त्यामुळे ही मालिका संकटात सापडली होती.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या वन-डे पूर्वी श्रीलंकेच्या टीममध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. त्यामुळे ही मालिका संकटात सापडली होती.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या वन-डे पूर्वी श्रीलंकेच्या टीममध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. त्यामुळे ही मालिका संकटात सापडली होती.

ढाका, 23 मे : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या वन-डे पूर्वी श्रीलंकेच्या टीममध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. श्रीलंकेच्या क्रिकेटपटूला कोरोना झाल्यानंतरही नियोजित वन-डे मालिका होणार आहे. एखाद्या क्रिकेटपटूला कोरोना झाल्यानंतरही त्याच दिवशी क्रिकेटची मॅच होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. यापूर्वी ंइंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका, पाकिस्तान सुपर लीग (PSL) आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धा क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्यानं स्थगित करावी लागली आहे.

दोन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका टीममधील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पहिल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले होते. श्रीलंका टीमचा बॉलिंग कोच चामिंडा वास (Chaminda Vaas) यांच्यासह इसरु उडाना (Isuru Udana) आणि शिरन फर्नांडो (Shiran Fernando) यांचा पहिला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या सर्वांची दुसऱ्यांदा आरटीआर-पीसीआर (RTR - PCR) टेस्ट करण्यात आली. यामध्ये चामिंडा वास आणि इसरु उडाना यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती श्रीलंकेचा क्रिकेटपटू दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याने दिली आहे.

शिरन फर्नाांडो याचा दुसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्याच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून या तिघांनाही हॉटेलमध्ये इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.

श्रीलंका प्रमाणेच बांगलादेशच्या कॅम्पमध्येही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. एक दिवसापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक खालिद महमूद (Khaled Mahmud) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते या मालिकेच्या दरम्यान उपस्थित राहणार नाहीत. त्यांना सध्या घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर बांगलादेश टीमच्या बस ड्रायव्हरला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

फॅन्सनी विचारला कोहली आणि धोनीबद्दल प्रश्न, सूर्यकुमारचे उत्तर वाचून वाटेल अभिमान

या मालिकेतील दुसरी आणि तिसरी वन-डे 25 आणि 28 मे रोजी नियोजित आहेत. या तीन्ही वन-डे ढाकामधील शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार आहेत.

First published:

Tags: Bangladesh cricket team, Coronavirus, Sri lanka