टूमुंबई, 12 सप्टेंबर : न्यूझीलंडची क्रिकेट टीम 3 वन-डे आणि 5 टी 20 मॅचच्या सीरिजसाठी पाकिस्तानात दाखल (New Zealand Tour of Pakistan) झाली आहे. यापूर्वी 2003 साली न्यूझीलंडची टीम वन-डे सीरिजसाठी पाकिस्तानात आली होती. त्यानंतर वर्षभरापूर्वी कराचीमधील हॉटेलच्या बाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामुळे न्यूझीलंडची टीम पाकिस्तानातून परतली होती.
न्यूझीलंडसोबत यंदा बॅटींग कोच म्हणून श्रीलंकेचा माजी बॅट्समन थिलन समरवीरा (Thilan Samaraweera) पाकिस्तानात आला आहे. समरवीराच्या पाकिस्ताशी संबंधित वाईट आठवणी आहेत. 2009 साली श्रीलंकेच्या टीमवर लाहोरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमच्या बाहेर श्रीलंका टीमच्या बसवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात समरवीरा गोळी लागून जखमी झाला होता.
Great to have arrived in Islamabad 🏏
Thanks for the warm welcome @TheRealPCB 🇵🇰 #PAKvNZ #CricketNation https://t.co/dmLaq7gygg — BLACKCAPS (@BLACKCAPS) September 11, 2021
3 महिन्यांनी केलं पुनरागमन
पाकिस्तानमध्ये गोळी लागल्यानंतरही समरवीरानं जिद्द सोडली नाही. त्यानं पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. श्रीलंकेच्या टीमवर हल्ला झाला त्यावेळी तो जबरदस्त फॉर्मात होता. त्यानं सलग 2 द्विशतक झळकावले होते. दहशतवाद्यांची गोळी लागल्यानं त्याच्यावर सर्जरी करावी लागली.
राजस्थानच्या खेळाडूचं CPL मध्ये वादळ, 11 सिक्ससह झळकावलं पाचवं शतक
समरवीरानं 3 महिने मानसिक आणि शारीरिक पातळीवर संघर्ष केल्यानंतर त्यानं त्याचवर्षी जुलैमध्ये पाकिस्तान विरुद्ध 50 वी टेस्ट मॅच खेळली. त्यानंतर 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर समरवीरा गेल्या दोन वर्षांपासून न्यूझीलंडच्या कोचिंग टीमचा सदस्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Pakistan