मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Happy Birthday Pollock : भेदक बॉलिंगचा जगभर दबदबा, मुंबईशी आहे खास नातं! एका चुकीनं केला मोठा घात

Happy Birthday Pollock : भेदक बॉलिंगचा जगभर दबदबा, मुंबईशी आहे खास नातं! एका चुकीनं केला मोठा घात

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट टीमचा (South Africa Cricket Team ) एकेकाळी संपूर्ण जगभर दबदबा होता. आफ्रिकेनं अनेक भेदक बॉलर, ऑल राऊंडर जगाला दिले

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट टीमचा (South Africa Cricket Team ) एकेकाळी संपूर्ण जगभर दबदबा होता. आफ्रिकेनं अनेक भेदक बॉलर, ऑल राऊंडर जगाला दिले

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट टीमचा (South Africa Cricket Team ) एकेकाळी संपूर्ण जगभर दबदबा होता. आफ्रिकेनं अनेक भेदक बॉलर, ऑल राऊंडर जगाला दिले

मुंबई, 16 जुलै :  दक्षिण आफ्रिकन क्रिकेट टीमचा (South Africa Cricket Team ) एकेकाळी संपूर्ण जगभर दबदबा होता. आफ्रिकेनं अनेक भेदक बॉलर, ऑल राऊंडर जगाला दिले. त्यामधील प्रमुख नाव म्हणजे शॉन पोलॉक (Shawn Pollock). पोलॉकच्या भेदक बॉलिंगमुळे प्रतिस्पर्धी टीमला धडकी भरत असे. जगातील कोणत्याही पिचवर आग ओकण्याची क्षमता त्याच्या बॉलमध्ये होती. त्याच्या बॉलिंगमुळे त्याचं बॅटींग कौशल्य झाकलं गेलं. पण, त्यानं बॅटींगमधील उपयुक्तता देखील अनेकदा सिद्ध केलीय. दक्षिण आफ्रिकेच्या टीमची कॅप्टनसीही त्यानं अत्यंत खडतर काळात सांभाळली आहे. पोलॉकची आज आठवण होण्याचं कारण म्हणजे आज म्हणजे 16 जुलै रोजी त्याचा वाढदिवस (Happy Birthday Pollock) आहे.

क्रिकेटचं घराणं

शोन पोलॉक हा आफ्रिकेतील प्रसिद्ध क्रिकेट घराण्यात जन्माला. पोलॉकच्या रक्तातच क्रिकेट आहे. त्यामुळे त्याला बाहेरून कुठूनही प्रेरणा घेण्याची गरज पडली नाही. शॉनचे वडील पीटर पोलॉक हेही दक्षिण आफ्रिकेच्या टीममधून खेळले होते. ते 60 च्या दशकातील दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलिंगचे अग्रणी होते. तर त्याचे काका ग्रॅम पोलॉक यांना जगातील सर्वोत्कृष्ट डावखुऱ्या बॅट्समनपैकी एक म्हणून ओळखलं जातं. शॉनचे आजोबा, पणजोबा आणि भाऊही क्रिकेटर होते. अर्थातच शॉनच्या घरातच क्रिकेट होतं. शॉन पोलॉकनं 1995-96 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यातून दक्षिण आफ्रिकेच्या टीमसाठी पदार्पण केलं. होतं.

1995 मध्ये पोलॉकनं इंग्लंड विरुध्द आपली पहिली टेस्ट मॅच (First Test Match In 1995) खेळली. पहिल्याच इनिंगमध्ये त्यानं 3 विकेट्स घेतल्या आणि निवड सार्थ ठरवली. त्यावेळेस पावसामुळे या टेस्ट मॅचचा खेळ फक्त दोनच दिवस होऊ शकला. त्यामुळे पोलॉकची बँटिंगची वेळ आली नाही. पोलॉकनं त्याच्या वनडे मध्ये ऑलराऊंडर खेळ करून दाखवला. त्यावेळेस त्यानं 66 रन्स केले आणि 4 विकेट्सही घेतल्या. इंग्ल्डविरोधातच वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

World Athletics Championships : बीडच्या अविनाश साबळेची फायनलमध्ये धडक

9 व्या नंबरवर रेकॉर्ड

त्यानंतर पोलॉकनं कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि यशाची एक एक पायरी तो चढतच गोला. टेस्ट मॅचमध्ये 400 विकेट्स घेणारा तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वात पहिला खेळाडू ठरला. त्याच्या 200 विकेट्स पूर्ण झाल्या तेव्हा त्या लिस्टमध्ये असलेल्या 41 प्लेयर्सपैकी पोलॉकची सरासरी सर्वांत कमी होती. टेस्टमध्ये शानदार बटलिंगबरोबरच त्यानं दमदार बँटिंगही केली आहे. पोलॉकनं टेस्टमध्ये दोन सेंच्युरीज लगावल्या होत्या. विशेष म्हणजे ही दोन्ही शतकं त्यानं 9 व्या नंबरवर खेळायला येऊन ठोकली होती.

श्रीलंकेच्या विरुद्ध २००१ मध्ये 9 व्या नंबरवर खेळताना त्यानं 111 रन केले होते. तर वेस्ट इंडिजविरुध्द खेळतानाही 9 व्या नंबरवर खेळून त्यानं नाबाद शतक ठोकलं होतं. 9 व्या नंबरवर बॅटिंग करून टेस्टमध्ये सर्वांत जास्त रन करण्याचं रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे. हा रेकॉर्ड आजही कायम आहे.

IND Vs ENG: रोहित-द्रविड मिळून 'या' गोलंदाजाची कारकीर्द बिघडवतायत?

एका चुकीचा फटका

मॅच फिक्सिंगमध्ये हॅन्सी क्रोनिएचं नाव आल्यानंतर एप्रिल 2000 मध्ये त्याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनपदाची धुरा देण्यात आली. कॅप्टनपदाची त्याची सुरुवात तर चांगली झाली. २००१-०२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेत मात्र दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा पराभव झाला होता. त्यानंतर त्याच्या कॅप्टनपदाचा ग्राफ खाली घसरायला सुरुवात झाली.2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये पोलॉक दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन होता.

त्या वर्ल्ड कपमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेला सुपर सिक्ससमध्येही प्रवेश करता आला नाही. श्रीलंके विरुद्धच्या मॅचमध्ये डकवर्थ लुईस मेथडचे गणित चुकीचे बसल्याचा फटका आफ्रिकेला बसला. त्यांची टीम वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. या चुकीचे खापर पोलॉकवर फुटले. कॅप्टन म्हणून ती त्याची शेवटची मॅच होती. त्याच्या कारकिर्दीमधील तो सर्वात खराब क्षण होता.

पोलॉकनं 108 टेस्ट, 303 वनडे, आणि 12 टी-20 मॅचेस खेळल्या आहेत. हे तीनही फॉरमॅट मिळून त्यानं सात हजारांपेक्षाही जास्त रन्स केले आहेत तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 800 पेक्षा जास्त विकेट्स आहेत.

मुंबईशी खास नातं

दक्षिण आफ्रिकन क्रिकेटच्या या दिग्गजाचं मुंबईशी देखील खास नात आहे. तो आयपीएलमधील पहिल्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचा प्रमुख सदस्य होता. सचिन तेंडुलकरची दुखापत आणि हरभजन सिंगवर श्रीशांतला थप्पड मारल्यानं बंदी आल्यानंतर त्यानं मुंबई इंडियन्सची कॅप्टनसी केली. त्यानंतर तो काही काळ मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचाही सदस्य होता.

First published:

Tags: Cricket news, On this Day, South africa