मुंबई, 3 मे: दक्षिण आफ्रिकेचा
(South Africa) मुख्य बॅट्समन असलेला डेव्हिड मिलर
(David Miller) भारतामध्ये देखील चांगलाच लोकप्रिय आहे. इंडियन प्रीमियर लीग
(IPL) स्पर्धेत त्यानं आक्रमक खेळी करुन भारतीय फॅन्सच्या मनात जागा निर्माण केली आहे. मिलर काही वर्षांपूर्वी पंजाब किंग्ज
(Punjab Kings) टीमचा सदस्य होता. आता तो राजस्थान रॉयल्सचा
(Rajasthan Royals) सदस्य आहे. त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये भारतीय फॅन्सची संख्या मोठी आहे.
आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. सध्या तो घरी असून या वेळेचा उपयोग करण्यासाठी सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झाला आहे. मिलरनं सोशल माीडियावर फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरं दिली. या सेशनच्या दरम्यान त्याला चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन
(CSK) महेंद्रसिंह धोनीबद्दल
(MS Dhoni) प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मिलरनं दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल
(Viral) झालं आहे.
'महेंद्रसिंह धोनी हा माझा आवडता क्रिकेटपटू आहे. बेस्ट फिनिशर. तो अतिशय शांतवृत्तीचा आणि नम्र स्वभावाचा आहे.' अशी प्रतिक्रिया मिलरनं दिली आहे.
सिंधूनं जिंकलं मन, रिओमध्ये पराभूत करणाऱ्या खेळाडूबाबत म्हणाली.
डेव्हिड मिलरला मागील आयपीएलमध्ये फक्त एक मॅच खेळण्याची संधी मिळाली. या आयपीएलमध्ये त्याला नियमित संधी मिळाली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये त्याने आक्रमक बॅटींग करत टीमच्या विजयात वाटा उचलला होता. आयपीएल स्पर्धेच्या उत्तरार्धातही मिलरकडून राजस्थान रॉयल्सला अपेक्षा आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.