मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Kohli vs Ganguly: माजी कॅप्टनची विराटला साथ, गांगुलीला सुनावले खडे बोल

Kohli vs Ganguly: माजी कॅप्टनची विराटला साथ, गांगुलीला सुनावले खडे बोल

टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यातील मतभेद काही दिवसांपूर्वी समोर आले. या विषयावर विराटला टीम इंडियाच्या माजी कॅप्टनची साथ मिळाली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 डिसेंबर : टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यातील मतभेद काही दिवसांपूर्वी समोर आले होते. विराटने दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी रवाना होण्यापूर्वी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॅप्टन आणि अध्यक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचं उघड झालं. त्यानंतर अजूनही या प्रकरणाचे पडसाद भारतीय क्रिकेट टीममध्ये उमटत आहेत. या विषयावर विराट कोहलीला टीम इंडियाच्या माजी कॅप्टनची साथ मिळाली आहे.

माजी कॅप्टन आणि निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी (Dilip Vengsarkar) या प्रकरणात सौरव गांगुलीला सुनावले आहे. 'निवड समितीच्या वतीनं सौरव गांगुलीला बोलण्याची काहीही गरज नव्हती. तो बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. कॅप्टनच्या नियुक्तीबाबत निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी बोलायला हवे होते. कॅप्टनची निवड करणे किंवा त्याला हटवणे हा निवड समितचा विषय आहे. ते गांगुलीचे कार्यक्षेत्र नाही.' असे वेंगसरकर यांनी स्पष्ट केले आहे. टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय विराटने जाहीर केल्यानंतर रोहित शर्माला वन-डे टीमचा कॅप्टन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण, लिमिटेड ओव्हर्समधील दोन प्रकारात वेगवेगळे कॅप्टन असणे योग्य नव्हते, असे गांगुली यांनी सांगितले होते.

वेंगसरकराचं मुंबई क्रिकेटमध्ये पुनरागमन!

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) जानेवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या आगामी सत्रासाठी वेंगसरकर यांची मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्याची शक्यता आहे. सय्यद मुश्ताक आली ट्रॉफी, आणि विजय हजारे ट्रॉफी या दोन्ही देशांतर्गत स्पर्धेत मुंबईची कामगिरी खराब झाली आहे. त्यानंतर एमसीएनं हा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. सर्वाधिक रणजी ट्रॉफीचं विजेतेपद मिळवणारी मुंबईची टीम या दोन्ही स्पर्धांमध्ये साखळी फेरीतच बाद झाली होती.  मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष जगदीश आचरेकर यांनी वेंगसरकर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला आहे.

एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या बॉलरची न्यूझीलंडच्या टीममधून हकालपट्टी

अमोल मजूमदार सध्या मुंबई टीमचा कोच आहे. रणजी स्पर्धेतील एलिट ग्रुपमध्ये कर्नाटक, दिल्ली, हैदराबाद, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या टीमच्या गटात मुंबईचा समावेश आहे. मुंबईचे साखळी फेरीतील सर्व सामने कोलकातामध्ये होणार आहेत.

First published:

Tags: Cricket news, Sourav ganguly, Virat kohli