जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या बॉलरची न्यूझीलंडच्या टीममधून हकालपट्टी

एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या बॉलरची न्यूझीलंडच्या टीममधून हकालपट्टी

एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या बॉलरची न्यूझीलंडच्या टीममधून हकालपट्टी

न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलनं (Ajaz Patel) भारताविरुद्ध मुंबईत झालेल्या टेस्टमध्ये एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्यानंतरही पुढच्या टेस्टमनधून त्याची टीममधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 डिसेंबर :  न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलनं (Ajaz Patel) भारताविरुद्ध मुंबईत झालेल्या टेस्टमध्ये एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. ही ऐतिहासिक कामगिरी करणारा तो टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील तिसराच बॉलर आहे. या कामगिरीनंतरही त्याची न्यूझीलंड टीममधून हकालपट्टी करण्यात आली आहे. बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा (New Zealand Squad) करण्यात आलेली आहे. यामध्ये आश्चर्यकारपणे एजाझचे नाव नाही. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) यांच्यातील दोन मॅचची टेस्ट सीरिज जानेवारी महिन्यात होणार आहे. या सीरिजसाठी न्यूझीलंडच्या 13 सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये केन विल्यमसनच्या (Kane Williamson) अनुपस्थितीमध्ये टॉम लॅथम (Tom Latham) टीमचा कॅप्टन असेल. विल्यमसन मुंबई टेस्टपूर्वी जखमी झाला होता. न्यूझीलंडच्या टीममध्ये डेव्हॉन कॉनवेचे (Devon Conway) पुनरागमन झाले आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. या टीममधील सर्वात धक्कादायक निर्णय हा एजाझ पटेलला बाहेर ठेवणे हा आहे. भारतीय वंशाचा रचिन रविंद्र  (Rachin Ravindra)  हा टीममधील एकमेव स्पेशालिस्ट स्पिनर आहे. तर टीम साऊदीची व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टॉम ब्लंडेलला विकेट किपर म्हणून जागा मिळाली आहे. न्यूझीलंडचे हेड कोच गॅरी स्टीड यांनी सांगितले की, ‘एजाझ पटेलनं भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यानंतरही त्याला टीममध्ये जागा नाही, हे पाहून तुम्हाला विचित्र वाटेल. पण, आमचा नेहमीच परिस्थितीचा विचार करून टीम निवडण्यावर भर असतो. आम्हाला आता बांगलादेश विरुद्ध आमच्या देशात टेस्ट सीरिज खेळायची आहे. या सीरिजमधील प्लेईंग 11 मध्ये त्याचा समावेश होणे अवघड होते.’ IND vs SA : टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तर काय? CSA ने दिली मोठी Update न्यूझीलंडची टीम: टॉम लॅथम (कॅप्टन), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, हेनरी निकल्स, डेरिल मिचेल, रचिन रवींद्र, काइल जेमिसन, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि नील वॅगनर.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात