मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन, दोन भावांच्या जोडीला मिळणार संधी!

'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन, दोन भावांच्या जोडीला मिळणार संधी!

टीम इंडिया (Team India) जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर (India tour of Sri Lanka) जाणार आहे. तीन वन-डे आणि तीन टी 20 मॅचचा हा दौरा आहे.

टीम इंडिया (Team India) जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर (India tour of Sri Lanka) जाणार आहे. तीन वन-डे आणि तीन टी 20 मॅचचा हा दौरा आहे.

टीम इंडिया (Team India) जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर (India tour of Sri Lanka) जाणार आहे. तीन वन-डे आणि तीन टी 20 मॅचचा हा दौरा आहे.

मुंबई, 20 मे: टीम इंडिया (Team India) जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर (India tour of Sri Lanka) जाणार आहे. तीन वन-डे आणि तीन टी 20 मॅचचा हा दौरा आहे. या दौऱ्याच्या वेळी भारतीय टीमचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये असतील. त्यामुळे तरुण खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) या टीमचा कोच असेल. तर शिखर धवन (Shikhar Dhawan) टीमचा कॅप्टन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'क्रिकबझ' नं दिलेल्या वृत्तानुसार या दौऱ्यावर शिखर धवनकडं टीमचं नेतृत्त्व दिलं जाणार आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्या-कृणाल पांड्या (Hardik Pandya -Krunal Pandya) आणि दीपक चहर - राहुल चहर (Deepak Chahar-Rahul Chahar) या दोन भावांच्या जोडीचा टीम इंडियामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

आरसीबीचा ओपनर देवदत्त पडिक्कल आणि केकेआरचा ओपनर नितीश राणा यांना या सीरिजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राहुल तेवतिया आणि वरुण चक्रवर्ती देखील श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकतात. या दोघांना इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्यानं माघार घ्यावी लागली होती. इंग्लंड दौऱ्यावर निवड न झालेला अनुभवी फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार श्रीलंकेला जाणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यास श्रेयस अय्यरचाही टीममध्ये समावेश होणार आहे.

पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडचा हॉट अंदाज, 'बिल्लो रानी..' गाण्यावर बेली डान्सचा VIDEO VIRAL

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 वन-डे आणि 3 टी 20 मॅचची सीरिज होणार आहे.  या दौऱ्यातील वन-डे मॅच 13, 16 आणि 19 जुलैला होणार असून टी 20 मॅच 22 ते 27 जुलैच्या दरम्यान अपेक्षित आहेत. सर्व सामने श्रीलंकेतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. भारतीय टीम या दौऱ्यासाठी 5 जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होईल.

First published:

Tags: India Vs Sri lanka, Shikhar dhavan, Team india