• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ‘IPL मागे धावणाऱ्यांना टीममध्ये जागा नको,’ आयपीएल विजेत्या कॅप्टनचीच मागणी

‘IPL मागे धावणाऱ्यांना टीममध्ये जागा नको,’ आयपीएल विजेत्या कॅप्टनचीच मागणी

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) स्थगित झालेल्या या आयपीएल सिझनचा उत्तरार्ध (IPL 2021) सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या आयपीएल स्पर्धेच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यस्त आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 जून: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून उदयास आली आहे. या स्पर्धेतून मोठी कमाई करण्याच्या उद्देशानं काही खेळाडू राष्ट्रीय टीमकडं दुर्लक्षित करतात. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) स्थगित झालेल्या या आयपीएल सिझनचा उत्तरार्ध (IPL 2021) सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या आयपीएल स्पर्धेच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यस्त आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंचा स्पर्धेतील सहभाग अनिश्चित आहे. त्यापार्श्वभूमीवर आयपीएलच्या मागे धावणाऱ्या खेळाडूंचा राष्ट्रीय टीममध्ये समावेश करु नये, असा सल्ला महान लेगस्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) याने दिला आहे. वॉर्नच्या कॅप्टनसीमध्येच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) टीमने आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये (IPL 2008) विजेतेपद पटकावले होते. तसंच वॉर्न राजस्थान रॉयल्सचा दीर्घकाळ मेंटॉर होता. राष्ट्रीय टीमकडे दुर्लक्ष चूक वॉर्नने ‘रोड टू अ‍ॅशेस’ या पॉडकास्टमध्ये बोलताना वॉर्ननं हा सल्ला दिला आहे. “आयपीएल किंवा दुसऱ्या लीगमध्ये खेळाडूंना जो पैसा मिळतो, त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला पैसा कमवायचा असेल, तर तसं करा. पण तुम्हाला देशसाठी क्रिकेट खेळायचं आहे आणि तरीही तुम्ही आयपीएलची निवड करत असाल तर अशा खेळाडूंना राष्ट्रीय टीममध्ये निवडणे योग्य नाही. हे खेळाडू कारणं देऊन आराम करतील. टेस्ट क्रिकेट खेळणार नाहीत आणि पैशांसाठी राष्ट्रीय टीमकडं दुर्लक्ष करतील हे चूक आहे.” वॉर्नने पुढे सांगितले की, “टेस्ट क्रिकेट एकदम खास आहे. क्रिकेटच्या या सर्वात दीर्घ प्रकारात खेळाडूंना स्वत:ला ओळखण्याची संधी मिळते. या क्रिकेटमध्ये त्याची खरी ओळख होते. टेस्ट खेळल्यानंतरही खेळाडू लीग क्रिकेट खेळत असतील तर मला काही अडचण नाही. श्रीलंका दौरा ‘या’ खेळाडूंसाठी महत्त्वाचा, निवड समितीला प्रभावित करण्याची शेवटची संधी सहा आठवडे जगातल्या कोणत्या तरी भागात जाऊन क्रिकेट खेळायचं आणि त्यामधून 30 लाख डॉलर्सची कमाई करायची हे खूप सोपं आहे. पण तुम्हाला एक क्रिकेटपटू म्हणून स्वत:ला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी टेस्ट क्रिकेट ही एकमेव जागा आहे.” असे वॉर्नने स्पष्ट केले.
  Published by:News18 Desk
  First published: