जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / U19 WC : टीम इंडियाचं अभिनंदन करताना शाहिद कपूरनं केली 'गलती से मिस्टेक'

U19 WC : टीम इंडियाचं अभिनंदन करताना शाहिद कपूरनं केली 'गलती से मिस्टेक'

U19 WC : टीम इंडियाचं अभिनंदन करताना शाहिद कपूरनं केली 'गलती से मिस्टेक'

भारतीय टीमनं पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) जिंकला आहे. या विजयानंतर अभिनेता शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) भारतीय टीमचे अभिनंदन केले. त्यावेळी त्यानं एक मोठी चूक केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 फेब्रुवारी : भारतीय टीमनं पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) जिंकला आहे. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियानं इंग्लंडचा 4 विकेट्सनं पराभव केला. भारतीय टीमनं फायनलमध्ये दमदार कामगिरी करत फायनलमध्ये इंग्लंडला 44.5 ओव्हर्समध्ये 189 रनवर रोखले. त्यानंतर 47.4 ओव्हर्समध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात विजेतेपदासाठी आवश्यक लक्ष्य पूर्ण केले. ऐतिहासिक विजेतेपदानंतर भारतीय टीमवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी टीमचं अभिनंदन केलं आहे. अभिनेता शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) देखील भारतीय टीमचे अभिनंदन केले. त्यावेळी त्यानं एक मोठी चूक केली. या चुकीमुळे शाहिद सोशल मीडियावर सध्या ट्रोल होत आहे. शाहिदनं भारतीय टीमचं अभिनंदन करताना 2018 साली वर्ल्ड कप जिंकलेल्या अंडर 19 टीमचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये पृथ्वी शॉ, शुभमन गिल, कमलेश नागरकोटी, शिवम मावी हे खेळाडू होते. शाहिदनं नंतर ती पोस्ट टिलिट केली. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. काही जणांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट घेतला होता. त्यांनी शाहिदला ट्रोल केले. हा स्क्रीनशॉट शेअर करत एका युझरनं लिहलं, ‘भावा हे काय केलंस….गलती से मिस्टेक.’ तर अन्य एका युझरनं याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. शाहिद कपूरनं आगामी ‘जर्सी’ सिनेमात एका क्रिकेटपटू भूमिका केली आहे. त्यामुळे त्याला क्रिकेटचं किमान ज्ञान आवश्यक आहे. तर अन्य एका युझरनं क्रिकेटची आवड नसेल तर पोस्ट का केली? असा प्रश्न विचारला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात