मुंबई, 27 सप्टेंबर : विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. विराटच्या या निर्णयानं अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीच्या वागणुकीची टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूनं बीसीसीआयकडं (BCCI) तक्रार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
'क्रिकेट नेक्स्ट' नं दिलेल्या वृत्तानुसार एका सिनिअर भारतीय खेळाडूनं इंग्लंड दौऱ्यात कॅप्टनच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केला असून त्याची बीसीसीआयकडं तक्रार केली आहे.
काही महिन्यांपासून सुरु होती धुसफूस
विराटनं वर्कलोडचं कारण देत टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत एका सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयचा विराटची कॅप्टन पदावरुन हकालपट्टी करण्याची योजना होती. त्याच्या कार्यकाळात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता न आल्यानं क्रिकेट बोर्ड त्याच्यावर नाराज होते. त्याचबरोबर टीम इंडियातही विराटबद्दल नाराजी सुरु झाली होती.
T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया अडचणीत, विराटला सतावतेय मोठी चिंता
भारतीय ड्रेसिंग रुममधील अनेक खेळाडू त्याच्या वागणुकीवर नाराज होते, असं वृत्त आहे. तो सिनिअर खेळाडू आर. अश्विन असल्याची माहिती देखील या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे, पण याबाबत अजून कोणतीही पृष्टी देण्यात आलेली नाही.
या सिनिअर खेळाडूनं विराटच्या वागणुकीची तक्रार बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याकडे केली होती. इंग्लंड दौऱ्यात अश्विनला एकही टेस्ट खेळायला मिळाली नाही. चौथ्या टेस्टमध्ये त्याला खेळवण्यात येईल असं टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी सांगितलं होतं. पण, विराटनं त्यांच्या सूचनेकडंही दुर्लक्ष केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Virat kohli