मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया अडचणीत, विराटला सतावतेय मोठी चिंता

T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडिया अडचणीत, विराटला सतावतेय मोठी चिंता

यूएई आणि ओमानमध्ये सुरू होणारा टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या पहिल्या मॅचसाठी आता फक्त 27 दिवस शिल्लक आहेत. या मॅचपूर्वी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) मोठी चिंता सतावत आहे.

यूएई आणि ओमानमध्ये सुरू होणारा टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या पहिल्या मॅचसाठी आता फक्त 27 दिवस शिल्लक आहेत. या मॅचपूर्वी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) मोठी चिंता सतावत आहे.

यूएई आणि ओमानमध्ये सुरू होणारा टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या पहिल्या मॅचसाठी आता फक्त 27 दिवस शिल्लक आहेत. या मॅचपूर्वी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) मोठी चिंता सतावत आहे.

दुबई, 27 सप्टेंबर : यूएई आणि ओमानमध्ये सुरू होणारा टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या पहिल्या मॅचसाठी आता फक्त 27 दिवस शिल्लक आहेत. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीखाली होणारी ही शेवटची टी20 स्पर्धा आहे. त्यामुळे या ही स्पर्धा जिंकून आयसीसी विजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. आगामी वर्ल्ड कपची रंगीत तालिम समजली जाणारी आयपीएल स्पर्धा सध्या सुरू आहे. वर्ल्ड कप टीममध्ये निवड झालेल्या खेळाडूंच्या या स्पर्धेतील कामगिरीमुळे कॅप्टन विराट कोहलीची चिंता वाढली आहे.

भारताची पहिली लढत पाकिस्तान विरुद्ध 24 ऑक्टोबरला होणार आहे. या मॅचला 4 आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. तरीही, या स्पर्धेत ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बॉलिंग करणार का? याचं ठोस उत्तर अजूनही मिळालेलं नाही. हार्दिक रविवारी सेकंड हाफमधील पहिली मॅच खेळण्यासाठी उतरला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) विरुद्ध झालेल्या या मॅचमध्ये हार्दिकनं बॉलिंग केली नाही. त्यामुळे तो किती फिट आहे याची चर्चा सुरू झाली आहे.

हार्दिक गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिंग करण्यासाठी पूर्ण फिट  नाही. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यातही त्याची निवड झालेली नाही. या आयपीएल सिझनमध्ये हार्दिक मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) 8 मॅच खेळला आहे. पण, यापैकी एकाही मॅचमध्ये त्याने बॉलिंग केलेली नाही. वर्ल्ड कपचा विचार करुन हार्दिकचं वर्कलोड मॅनेज केलं जात आहे, असं मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बॉन्डनं सांगितलं होतं. पण, वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेच्यापूर्वी हार्दिक कधी प्रॅक्टीस करणार हा प्रश्न आहे.

RCB vs MI : विराट ठरला रोहितवर भारी, मुंबई इंडियन्स हरली पुन्हा दुबईच्या दारी!

मुंबई इंडियन्सनं या आयपीएल सिझनमध्ये 14 पैकी 10 मॅच खेळल्या असून त्यांच्या आता 4 मॅच शिल्लक आहेत. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या क्रमांकावर असलेल्या मुंबईची 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हार्दिककडं या स्पर्धेत बॉलिंग करण्यासाठी फक्त 4 मॅच शिल्लक आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या मॅचपूर्वी टीम इंडिया 2 प्रॅक्टीस मॅच खेळणार आहे.

RCB vs MI : सरस छे, हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सला पाडले भगदाड, साधली हॅट्रटिक

फक्त 16 ओव्हर बॉलिंग

टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. त्या दौऱ्यात हार्दिक 3 वन-डे मॅच खेळला होता. या मॅचमध्ये त्यानं फक्त 14 ओव्हर बॉलिंग केली होती. हार्दिकनं पहिल्या मॅचमध्ये  5 तर दुसऱ्या मॅचमध्ये 4 आणि तिसऱ्या मॅचमध्ये 5 ओव्हर बॉलिंग केली होती. यामध्ये त्यानं 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर एकमेव टी20 मॅच त्यानं खेळली. यामध्ये त्यानं 2 ओव्हर बॉलिंग करत 1 विकेट घेतली होती.

First published:

Tags: Hardik pandya, T20 world cup, Virat kohli