महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) या आयपीएल सिझनमध्ये जोरदार पुनरागमन केले. दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धची पहिली मॅच गमावल्यानंतर चेन्नईने सलग पाच मॅच जिंकल्या. तर स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये चेन्नईचा निसटता पराभव झाला. 'महेंद्रसिंह धोनी स्वत: CSK पासून दूर होणार', 'या' क्रिकेटपटूचा दावा आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी चेन्नईची टीम सात मॅचमध्ये पाच विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर होती. आता आयपीएल सिझनचा दुसरा टप्पा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात धोनी पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MS Dhoni, Photo viral, Sakshi dhoni, Social media