मुंबई, 23 सप्टेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातील आजवरचा सर्वश्रेष्ठ खेळाडू का समजला जातो हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. वयाची 49 वर्षं पूर्ण केलेल्या सचिनची आणि त्याच्या जबरदस्त खेळीची क्रेझ चाहत्यांमध्ये अजूनही आहे. त्याच्या रिटायरमेंटला जवळपास नऊ वर्षं झाली आहेत, पण त्याच्या खेळात मात्र तो मैदानापासून दूर असल्याचं आणि त्याचं वय वाढल्याचं जाणवत नाही. नुकताच सचिन रोड वर्ल्ड सेफ्टी सीरिजच्या 14 व्या मॅचमध्ये खेळताना दिसला. या मॅचमध्ये सचिनने इंग्लंड लिजंडविरुद्धच्या मॅचमध्ये 20 बॉल्समध्ये 40 रन्स केले, सचिननं या खेळीत 3 फोर आणि 3 सिक्स लगावले. या मॅचमध्ये सचिनचा स्ट्राइक रेट 200 होता. इंडिया लिजंड विरूद्ध इंग्लंड लिजंड यांच्यामध्ये झालेल्या या मॅचमध्ये इंडिया लिजंडने म्हणजेच भारताने 40 रन्सने विजय मिळवला. विशेष म्हणजे पावसामुळे ही मॅच फक्त15 ओव्हर्सची खेळवण्यात आली होती. आधी बॅटिंग करताना इंडिया लिजंडने 15 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 170 रन्स केले होते. त्यापैकी 40 रन्स सचिनने केले आणि युवराजसिंगने केवळ 15 बॉलमध्ये 31 रन्सची नाबाद खेळी केली. त्याने 3 सिक्स व 2 फोर मारले. यानंतर इंग्लंड लिजंड टीम हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरली पण, त्यांना 15 ओव्हरमध्ये फक्त130 रन्स करता आले.
या मॅचमध्ये सर्वाधिक लक्ष सचिननं वेधून घेतलं. कारण या मॅचमध्ये पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरने तेच सर्व शॉट्स खेळले, ज्यासाठी तो ओळखला जात होता. वयाच्या 49 व्या वर्षी सचिनने केलेली फटकेबाजी पाहून त्याचे चाहतेही खूश झाले. रिटायरमेंटनंतर सचिनला त्याचे जुने शॉट्स खेळताना पुन्हा एकदा बघणं ही खरं तर त्याच्या फॅन्ससाठी मेजवानीच होती.
Just @sachin_rt things !! pic.twitter.com/BHwARvuuVs
— Sachinist (@Sachinist) September 22, 2022
सचिनला पुन्हा एकदा त्याच्या जुन्या अवतारात पाहून त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. त्याने मारलेले शॉट्स पाहून सोशल मीडियावर त्याचे चाहते जुन्या आठवणी शेअर करत आहेत. त्याने आता खेळलेले शॉट्स हे हुबेहुब त्याने खेळलेल्या 90 च्या दशकातील मॅचमधील शॉट्ससारखे वाटत आहेत. त्यामुळे ते सचिनला 90 च्या दशकात बघतायत, की आता 2022मध्ये बघतायत, असा प्रश्न पडला आहे. एकंदरीतच सोशल मीडियावर सचिनच्या व्हिडिओंचा पूर आलाय.
𝗦𝗵𝗮𝗿𝗷𝗮𝗵 𝟮.𝟬 😍🙌🔟🏏 whattttt a playerrr 💙@sachin_rt turning back the clock 🕰️🔄#RoadSafetyWorldSeries #sachintendulkar #sharjah #GOAT #God pic.twitter.com/DflUaugI4N
— Ashish Verma (@ashu112) September 22, 2022
सचिन तेंडुलकरने मारलेला शॉट पाहून चाहत्यांना त्याची 1998 मध्ये खेळलेली ‘डेझर्ट स्टॉर्म’ इनिंग आठवली. या खेळीदरम्यान सचिनने मारलेल्या शॉट्समधील काही शॉट अगदी तसेच आहेत. सचिनचे 1998 मधील व्हिडिओ आणि आता 2022 मधील खेळतानाचे व्हिडिओ एकत्र करून यातला फरक तुम्ही ओळखू शकता का? गेल्या 24 वर्षांत त्याच्या खेळात कोणताही बदल झालेला नाही, अशीच फॅन्सची भावना आहे.

)







