या फेअरवेल सामन्यात रॉस टेलर तीन मॅकेंजी, जाँटी आणि एडिलेड या तीन मुलांसह राष्ट्रगीतासाठी मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या तिन्ही मुलांनी ब्लॅक कॅप्सचा टी शर्ट घातला होता. या टी शर्टवर रॉस टेलर असे नाव लिहिले होते. किवी संघाने 3 सामन्यांची मालिका आधीच जिंकली आहे. मालिकेत संघ 2-0 ने पुढे असून आता क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टेलर देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. 2020 मध्ये तीनही फॉरमॅटमध्ये 100-100 सामने खेळणारा टेलर जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.Ross Taylor tears up during the national anthem 💔 pic.twitter.com/QukiuyAqEn
— Sritama Panda (Ross Taylor’s version) (@cricketpun_duh) April 4, 2022
2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टेलरने न्यूझीलंडकडून 112 कसोटी सामन्यांमध्ये 7 हजार 683 धावा केल्या. ज्यामध्ये 19 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. IPL 2022: CSK च्या पराभवानंतर रैनाची चर्चा, टीम मॅनेजमेंटला मिळाली तिसरी वॉर्निंग! त्याने 235 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 हजार 593 धावा केल्या ज्यात 21 शतके आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 102 टी-20 सामन्यात 1909 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याच्या नावावर 7 अर्धशतके आहेत. भारताला पराभूत करून कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविजेता बनलेल्या न्यूझीलंड संघाचा टेलर देखील एक भाग होता. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत विजयी धावा केल्या. टेलरने त्याच वेळी बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.Special moments for @RossLTaylor and his family before play at Seddon Park. Follow KFC ODI 3 from Hamilton LIVE with @sparknzsport. #ThanksRosco #NZvNED pic.twitter.com/tSurjjarsH
— BLACKCAPS (@BLACKCAPS) April 4, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.