मुंबई, 10 डिसेंबर : टीम इंडियाच्या वन-डे टीमच्या कॅप्टनपदी विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयनं बुधवारी याबाबतची घोषणा केली. आगामी दक्षिण आफ्रिका सीरिजपासून रोहित वन-डे टीमचा पूर्णवेळ कॅप्टन असेल. भारतीय क्रिकेटमधील या बदलाबाबत वेगवेगळ्या क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या विषयावर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. नितीन राऊत यांनी विराटला कॅप्टन पदावरून हटवण्याचा प्रसंग टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) झालेल्या टीकेशी जोडला आहे. त्या प्रकरणानंतरच विराटची कॅप्टनसी जाणार हे स्पष्ट झाले होते, असा दावा त्यांनी केला आहे. ‘पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर ज्या खंबीरपणे विराट कोहली महंमद शमीच्या पाठीशी उभा राहिला होता, तेव्हाच अंदाज यायला हवा होता की त्याचं कर्णधारपद जाणार. क्रिकेट नियामक मंडळात सध्या ‘शाहजादे’ राज्य करतायत ना! असं ट्विट राऊत यांनी केले आहे.
पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर ज्या खंबीरपणे विराट कोहली महंमद शमीच्या पाठीशी उभा राहिला होता, तेव्हाच अंदाज यायला हवा होता की त्याचं कर्णधारपद जाणार.
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) December 10, 2021
क्रिकेट नियामक मंडळात सध्या 'शाहजादे' राज्य करतायत ना!
काय घडले होते प्रकरण? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (India vs Pakistan) 10 विकेटने दारूण पराभव झाला. या पराभवानंतर काही ट्रोलर्सनी भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर (Mohammad Shami Trolling) निशाणा साधला. मोहम्मद शमीने मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप करण्यात आले. त्यानंतर विराटनं शमीच्या पाठीशी ठाम उभं राहत त्याचा धर्म काढणाऱ्यांना सुनावले होते. ‘मी टीम इंडियाचा कोच होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले,’ रवी शास्त्रींचा मोठा गौप्यस्फोट ‘खूप लोक सोशल मीडियावर आपली ओळख लपवतात आणि खेळाडूंना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. हे खूप खालच्या पातळीचं आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते, म्हणून हा ड्रामा केला जातो. खेळाडूचं समर्थन कसं करायचं ते आम्हाला माहिती आहे. सोशल मीडिया ट्रोलिंग आणि बाहेरच्या आवाजांचं आमच्यासाठी काहीही महत्त्व नाही,’ असं विराट कोहली म्हणाला होता.