Home /News /sport /

IPL मधील रोहितच्या संकटमोचकानं दूर लोटला पैसा, वाचा का घेतला निर्णय

IPL मधील रोहितच्या संकटमोचकानं दूर लोटला पैसा, वाचा का घेतला निर्णय

मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मानं (Tilak Varma) आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी केली. या यशानंतरही त्याचे पाय जमिनीवरच आहेत.

    मुंबई, 12 जून : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सनला (Mumbai Indians) फार कमाल करता आली नाही. पाच आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या या टीमला शेवटच्या नंबरवर समाधान मानावं लागलं. मुंबई इंडियन्सच्या या निराशाजनक कामगिरीतही तिलक वर्मा (Tilak Varma) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिलकला मुंबईनं 1 कोटी 70 लाखांना खरेदी केले होते. त्याने त्याच्याकडील सर्व अपेक्षा पूर्ण करत 14 सामन्यात 397 रन केले. तो मुंबईकडून या सिझनमध्ये सर्वाधिक रन करणारा इशान किशननंतरचा दुसरा क्रिकेटपटू ठरला. या सर्व यशानंतरही तिलकचे पाय जमिनीवरच आहेत. त्यानं त्याला मिळालेली सर्व कमाई वडिलांच्या हवाली केली असून स्वत:ला या पैशांपासून दूर करा, असा सल्ला दिला आहे. तिलकनं प्रोफेशनल क्रिकेटपटू होण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यानं याबद्दलची माहिती दिली होती. तिलकचे वडील इलेक्ट्रेशियन आहे. मुलानं डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. 'माझ्याकडं क्रिकेटचं करिअर सोडून अन्य गोष्टींचा विचार करायला वेळ नव्हता. कारण, मला चांगली नोकरी आणि आर्थिक स्थैर्याची गरज होती. आर्थिक तंगीमुळे कौटुंबिक कार्यक्रम तसंच लग्नामध्येही आम्ही जाऊ शकत नव्हतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज आमच्याकडं आवडती कार खरेदी करण्यासाठी पैसे आहेत,' असे तिलकने सांगितले. 'द वीक' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिलक म्हणाला की, 'मी अंडर 16 टीममध्ये जागा मिळवण्यासाठी खूप मेहनत केली होती. मी तेव्हा 14 वर्षांचा होतो. सकाळी लवकर उठून मैदानात जात असे. अनेकदा वेळेवर खातही नसे. मी स्टेट टीमच्या कँपमध्ये एकही दिवस ब्रेक घेतला नाही.' त्यानंतर तिलकची अंडर 19 वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड झाली. हा त्याचा क्रिकेट करिअरमधील पहिला मोठा ब्रेक होता. 35 शतकं झळकावणाऱ्या खेळाडूच्या बहिणीची बिकट अवस्था, फॅन्सना केलं इमोशनल आवाहन तिलकनं यावेळी त्याच्या कमाईबद्दलही मोठा खुलासा केला. 'मी माझे सर्व पैसे वडिलांकडे दिले असून स्वत:ला यापासून दूर ठेवलं आहे. या पैशांचा माझ्यावर कोणताही परिणाम व्हावा असं मला वाटत नाही.त्यामुळे मी आजवर जे कमावलंय ते सर्व वडिलांकडं सोपवलं असून मला या पैशांपासून दूर ठेवा असं त्यांना सांगितलं आहे. पैसे मिळाले की लक्ष विचलित होणे अगदी सोपं असतं हे मला माहिती आहे,' असे त्याने स्पष्ट केले.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Cricket news, Ipl 2022, Mumbai Indians

    पुढील बातम्या