मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

6,6,6,6... युवराज सिंगचा जुना अवतार, सहा सिक्स लगावत जागवल्या आठवणी; पाहा VIDEO

6,6,6,6... युवराज सिंगचा जुना अवतार, सहा सिक्स लगावत जागवल्या आठवणी; पाहा VIDEO

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या (Road Safety World Series) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये युवराजचा (Yuvraj Singh) जुना अवतार पाहयला मिळाला.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या (Road Safety World Series) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये युवराजचा (Yuvraj Singh) जुना अवतार पाहयला मिळाला.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या (Road Safety World Series) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये युवराजचा (Yuvraj Singh) जुना अवतार पाहयला मिळाला.

  • Published by:  News18 Desk

रायपूर, 14 मार्च : भारताचा ऑल राऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) आता  क्रिकेटममधून रिटायर झाला आहे. मात्र आजही त्याच्या बॅटिंगमध्ये आक्रमकता कायम आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या (Road Safety World Series) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये युवराजचा जुना अवतार पाहयला मिळाला. दक्षिण आफ्रिका लिजेंड्स विरुद्धच्या मॅचमध्ये युवराजनं त्याच्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत सहा सिक्स लगावले. त्यापैकी चार सिक्स तर त्याने सलग खेचले. त्यावेळी सर्वांनाच 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराजने एकाच ओव्हरमध्ये लगावलेल्या सहा सिक्सची आठवण झाली.

रायपूरमध्ये झालेल्या या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिका लिजेंड्सने (South Africa Legends) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) लवकर आऊट झाला. त्यानंतर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) त्याच्या सहज शैलीत 60 रन काढले. सचिननं त्यासाठी फक्त 37 बॉल घेतले. तसंच दुसऱ्या विकेटसाठी बद्रीनाथसोबत 95 रनची पार्टरनरशिप केली.

सचिननंतर युवराज सिंहनं इंडिया लिजेंड्सच्या (India Legends) इनिंगची सूत्रं हाती घेतली. त्याने 18 व्या ओव्हरमध्ये सलग चार सिक्स खेचले. युवराजनं 22 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने नाबाद 52 रन काढले. त्याच्या फटकेबाजीमुळे इंडिया लिजेंड्सनं 3 आऊट 204 असा विशाल स्कोअर उभा केला.

( वाचा : On This Day: लक्ष्मण-द्रविड दिवसभर खेळले आणि बदललं भारतीय क्रिकेट! )

दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 148 पर्यंत मजल मारता आली. युवराजनं बॅटींग प्रमाणे बॉलिंगमध्येही कमाल करत दोन विकेट्स घेतल्या. या विजयासह इंडिया लिजेंड्स 20 पॉईंट्ससह अव्वल क्रमांकावर पोहचली आहे. श्रीलंका 16 पॉईंट्सह दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिका 12 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेची फायनल 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा मागील वर्षी पूर्ण होऊ शकली नव्हती.

First published:

Tags: Cricket, Sachin tendulkar, Sports, Virender sehwag, Yuvraj singh