मुंबई, 17 नोव्हेंबर: टीव्ही रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने 3’ (Dance Deewane 3) चा होस्ट राघव जुयालनं (Raghav Juyal) केलेल्या वर्णद्वेषी वक्तव्यावर सध्या नाराजीचं वातावरण आहे. या कार्यक्रमात राघवनं एका आसाममधील छोट्या स्पर्धाकाची ओळख करून देताना हे वक्तव्य केलं होत. त्यामुळे राघवर टीका होत असून क्रिकेटपटूनंही त्यावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. राघव आसाममधून आलेल्या छोट्या स्पर्धकाची ओळख करून देताना म्हणाला होताी की, ‘या लहान मुलीची चीनी समजणार नाही, पण तिचा डान्स समजेल.’ राघवच्या वर्णद्वेषी वक्तव्यावर आसामचा क्रिकेटपटू रियान पराग (Riyan Parag) नाराज झाला आहे. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणाऱ्या रियाननं आसाम हा अन्य कोणत्याही राज्याप्रमाणे भारताचा भाग असल्याचं सांगत राघवच्या वक्तव्या निषेध करणार ट्विट केलं आहे.
Assam is very much in India as any other state. No hate to this man but these comparisons need to stop. Jai Hind. Joi Axom. 🇮🇳 https://t.co/pbgZRp2kCb
— Riyan Paragg (@ParagRiyan) November 15, 2021
‘आसाम अन्य कोणत्याही राज्याप्रमाणे भारताचा भाग आहे. या माणसाबद्दल माझ्या मनात कोणताही द्वेष नाही, पण या प्रकारची तुलना थांबवण्याची गरज आहे. जय हिंद, जय आसाम’ असं ट्विट रियाननं केलं आहे. या प्रकरणात जोरदार टीका झाल्यानंतर राघवनं सारवासारव करत स्पष्टीकरण दिलं आहे. माझा उद्देश कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता.आपल्याला अनेकदा स्क्रिप्ट प्रमाणे बोलायला आवडत नाही. माझा उत्स्फूर्तपणे काम करण्यावर विश्वास आहे, असं राघवं सांगितलं. PAK vs BAN : पाकिस्तान टीमच्या कृतीनं बांगलादेशात संताप, सीरिज रद्द करण्याची मागणी ‘मी करून दिलेल्या परिचयाबद्दल तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. माझा किंवा चॅनलचा असा कोणताही उद्देश नव्हता. सामन्यपणे शो मध्ये स्क्रिप्ट असते. पण मी स्क्रिप्टप्रमाणेबोलत नाही. मी उत्स्फूर्तपणे बोलतो. आपलं काम प्रामाणिकपणे करण्यावर माझा विश्वास आहे,’ असं स्पष्टीकरण त्यानं दिलं आहे.

)







