मुंबई, 17 नोव्हेंबर: पाकिस्तानची टीम 3 टी 20 मॅचच्या मालिकेसाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर (Bangladesh vs Pakistan) आहे. या मालिकेसाठी दोन्ही टीम सध्या जोरदार सराव करत आहेत. याचवेळी पाकिस्तान टीमच्या एका कृतीनं बांगलादेशात संतापाचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या टीमनं एका सराव सत्रापूर्वी मीरपूरच्या मैदानात पाकिस्तानचा झेंडा लावला होता. त्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण मोहत्सवी वर्षाला गालबोट लावण्यासाठी पाकिस्ताननं ही राजकीय कृती केल्याचा आरोप बांगलादेशच्या फॅन्सनी केला आहे. यापूर्वी अनेक विदेशी टीमनी क्रिकेट मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा केला आहे. पण, त्यांनी आजवर सराव सत्रात त्यांच्या देशाचा झेंडा लावलेला नाही. आता पाकिस्तानला त्यांचा झेंडा लावून काय सिद्ध करायचं आहे ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
Pakistan team training and practice session underway in Dhaka, Bangladesh #HarHaalMainCricket | #BANvPAK pic.twitter.com/zHcLajpwtq
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 16, 2021
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं हा विरोध सुरू होताच स्पष्टीकरण दिलं असून गेल्या 2 महिन्यांपासून टीम अभ्यास सत्रात त्यांच्या देशाचा झेंडा लावून खेळत असल्याचं म्हंटलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं मात्र या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सोशल मीडियावर पाकिस्तानच्या टीमवर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानने सराव सत्राच्या दरम्यान लावलेला झेंडा काढावा अशी मागणी फॅन्सनी केली आहे. तर अनेक युझर्सनी ही कृती लाजीरवाणी असल्याचं सांगत या प्रकारावर बंदी घालावी आणि पाकिस्तान विरुद्धची मालिका रद्द करावी अशी मागणी केली आहे.
पाकिस्तानच्या टीमनं यंदा झालेल्या वर्ल्ड कपमध्ये तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेची सेमी फायनल गाठली होती. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं त्यांचा पराभव केला. तर बांगलादेशनं सुपर 12 मधील सर्व सामने गमावले होते. रोहित-द्रविड युगाची होणार आज सुरूवात, टीम इंडिया करणार अनेक प्रयोग

)







