जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सुरेश रैनानंतर रविंद्र जडेजानं वापरलं 'जातीय कार्ड', सोशल मीडियावर troll

सुरेश रैनानंतर रविंद्र जडेजानं वापरलं 'जातीय कार्ड', सोशल मीडियावर troll

सुरेश रैनानंतर रविंद्र जडेजानं वापरलं 'जातीय कार्ड', सोशल मीडियावर troll

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) यानं मी ब्राह्मण (Brahmin) असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यापाठोपाठ टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) जातीय कार्ड वापरलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जुलै: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) यानं मी ब्राह्मण (Brahmin) असल्याचं वक्तव्य केलं होतं. रैनाच्या या वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद ताजा आहे. त्यातच टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यानं जातीय कार्ड वापरलं आहे. जडेजा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तीन दिवसांच्या सराव सामन्यात जडेजानं चांगली कामगिरी केली. या चांगल्या कामगिरीनंतर एका पोस्टमुळे तो वादात सापडला आहे. जडेजानं नेहमीसाठी राजपूत बॉय, जय हिंद! असं ट्विट केलं आहे. त्याच्या या ट्विटनंतर वाद निर्माण झाला आहे. जातीवादाच्या नादात देशाचं वाटोळं होत आहे, जड्डूकडून अशा प्रकारच्या पोस्टची अपेक्षा नव्हती. तू जातीयवादाला चालना देत आहेस, हे खरंच लज्जास्पद आहे, असं ट्विट एका युझरनं केलं आहे. ‘कोणतीही व्यक्ती जन्मानं श्रेष्ठ ठरत नाही. तुम्ही जे बनला आहात त्याचा अभिमान बाळगा. जे लेबल तुमच्यावर लादण्यात आलंय त्याचा नको, असा सल्ला आणखी एका युझरनं जडेजाला दिला आहे.

News18

News18

रैनाच्या वक्तव्याचा वाद रविंद्र जडेजापूर्वी सुरेश रैनाच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता.  तामीळनाडू प्रीमियर लीग म्हणजेच टीएनपीएलच्या (TNPL) सोमवारी झालेल्या मॅचच्या कॉमेंट्रीसाठी सुरेश रैनाला बोलावण्यात आलं होतं. या मॅचदरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) खेळाडू असलेल्या रैनाला कॉमेंटेटरने दाक्षिणात्य संस्कृतीजवळ जाणं कसं शक्य झालं, असा प्रश्न विचारला. कॉमेंटेटरच्या प्रश्नाचं उत्तर देताना रैना म्हणाला, ‘माझ्या मते मीही ब्राह्मण आहे. 2004 पासून मी चेन्नईमध्ये खेळत आहे. मला इथल्या संस्कृतीबद्दल प्रेम आहे. तसंच मला टीममधले सहकारीही आवडतात. मी अनिरुद्ध श्रीकांत, सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्यासोबत खेळलो आहे. IND vs SL, 3rd ODI LIVE : धवननं टॉस जिंकला, टीम इंडियाकडून 5 जणांचे पदार्पण त्यांच्याकडून तुम्ही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आमच्या टीमचं प्रशासनही चांगलं आहे. आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या टीममध्ये असल्याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. आम्ही तिकडे आणखी सामने खेळू अशी अपेक्षा आहे,’ असं वक्तव्य रैनाने केलं होतं.  या वक्तव्यानंतर रैनावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात