• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL, 3rd ODI LIVE: धवननं टॉस जिंकला, टीम इंडियाकडून 5 जण करणार पदार्पण

IND vs SL, 3rd ODI LIVE: धवननं टॉस जिंकला, टीम इंडियाकडून 5 जण करणार पदार्पण

शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला तिसरी वन-डे जिंकून यजमानांना 'व्हाईट वॉश' देण्याची (India vs Sri Lanka) संधी आहे. या मॅचमध्ये 5 जण भारतीय टीममध्ये पदार्पण करणार आहेत.

 • Share this:
  कोलंबो, 23 जुलै: शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला तिसरी वन-डे जिंकून यजमानांना 'व्हाईट वॉश' देण्याची (India vs Sri Lanka) संधी आहे. प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यानं या दौऱ्यावर संपूर्ण नवी टीम इंडिया पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या टीमनं पहिल्या दोन्ही वन-डे जिंकत मालिका यापूर्वीच खिशात टाकली आहे. तिसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवननं टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियानं ही मालिका जिंकल्यानं या टीममध्ये 6 बदल केले आहेत. तर पाच जणांना पदार्पण करण्याची संधी दिली आहे. संजू सॅमसन (Sanju Samson),  नितीश राणा (Nitish Rana), के. गौतम (K. Gowtham),  राहुल चहर (Rahul Chahar) आणि चेतन सकारिया (Chetan Sakariya) हे पाच जण या मॅचमध्ये  पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर नवदीप सैनीलाही टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. टीम इंडियाच्या बॉलर्सनी मागील दोन्ही मॅचमध्ये योग्य वेळी विकेट्स घेत श्रीलंकेला मोठा स्कोअर करण्यापासून रोखले होते. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या जोडीनं पहिल्या दोन वन-डेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दीपक चहरनं (Deepak Chahar) बॉलिंग प्रमाणेच बॅटींगमध्येही चांगली कामगिरी करत दुसरी वन-डे जिंकून दिली होती. ही वन-डे सुरु होण्यापूर्वीच श्रीलंकेला एक धक्का बसला आहे. त्यांचा लेगस्पिनर वनिन्दू हसरंगा ही वन-डे खेळणार नाही. त्याचा पाय दुखावला आहे. हसरंगा दुसऱ्या वन-डेमध्ये श्रीलंकेचा सर्वोत्तम बॉलर होता. त्याने 10 ओव्हर्समध्ये 37 रन देत 3 विकेट्स घेतल्या होत्या दुसऱ्या वन-डेवर बराच काळ वर्चस्व गाजवल्यानंतरही श्रीलंकेला तिसरी वन-डे जिंकता आली नव्हती. आता घरच्या मैदानावर व्हाईटवॉशची नामुश्की टाळण्यासाठी त्यांना शर्थीचा प्रयत्न करावा लागेल. भारताची Playing 11 शिखर धवन, पृथ्वी शॉ, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, के. गौतम, राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया
  Published by:News18 Desk
  First published: