मुंबई, 23 सप्टेंबर : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं मागच्या आठवड्यात टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. विराट आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर या प्रकारत कॅप्टनसी करणार आहे. विराटच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. आता विराट कोहलीनं हा निर्णय एका व्यक्तीच्या सल्ल्यानंतर घेतला आहे. त्या व्यक्तीचं नाव आता समोर आलं आहे. याबाबतच्या मीडिया रिपोर्टनुसार भारतीय क्रिकेट टीमचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराटला वन-डे आणि टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा सल्ला दिला होता. विराटनं फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन राहावा असा सल्ला शास्त्रींनी दिला होता. विराटनं बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करुन जगातील टॉप बॅटर होण्यासाठी शास्त्री यांनी हा सल्ला दिला होता. कधी दिला होता सल्ला? बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार शास्त्री यांनी जवळपास 6 महिन्यांपूर्वीच विराटला हा सल्ला दिला होता. पण, त्यावेळी त्यानं हे मत मान्य केलं नाही. विराट अजूनही वन-डे टीमची कॅप्टनसी करण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे त्यानं फक्त टी 20 प्रकारात वर्ल्ड कप नंतर नेतृत्त्व करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. विराट लवकरच देणार तिसरा धक्का, T20 वर्ल्ड कपनंतर ‘या’ प्रकारातून होणार निवृत्त! भारतीय क्रिकेट टीमनं जानेवारी महिन्यात नियमित कॅप्टनच्या शिवाय ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकली होती. त्यानंतर विराटच्या कॅप्टनसीवर चर्चा सुरु झाली. विराटला 2023 च्या वन-डे वर्ल्ड कपपूर्वी या प्रकारातील कॅप्टनसी सोडावी लागू शकते, असंही या बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. RCB ची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय विराट कोहलीनं या आयपीएल सिझननंतर (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपण आरसीबीचं नेतृत्व सोडलं असलं तरीदेखील आपण शेवटपर्यंत आरसीबीसाठीच खेळू असं विराटने स्पष्ट केलं आहे. RCB मध्ये होणार भूकंप! विराट कोहलीची कर्णधारपदावरुन हकालपट्टी होणार? 2013 साली विराट कोहलीला आरसीबीचं नेतृत्व देण्यात आलं, यानंतर त्याच्या नेतृत्वात टीमला 60 मॅच जिंकता आल्या, तर त्यांना 65 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीची विजयी टक्केवारी 48.04 एवढी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.