जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Asia Cup : भारत-पाकिस्तान मॅचपूर्वी द्रविड होईल फिट! शास्त्रीनं सांगितलं औषधाचं नाव

Asia Cup : भारत-पाकिस्तान मॅचपूर्वी द्रविड होईल फिट! शास्त्रीनं सांगितलं औषधाचं नाव

Asia Cup : भारत-पाकिस्तान मॅचपूर्वी द्रविड होईल फिट! शास्त्रीनं सांगितलं औषधाचं नाव

राहुल द्रविडला (Rahul Dravid) कोरोना झाल्याने भारतीय टीमने काळजी करू नये, तो 3-4 दिवसांत मैदानात परत येईल, असा विश्वास टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यक्त केला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 24 ऑगस्ट : आशिया कप क्रिकेट स्पर्धा (Asia Cup Cricket) तोंडावर आलेली असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना कोरोनाचीा लागण झाली आहे. 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय टीम दुबईला रवाना झालीय. 27 तारखेलाच भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा महामुकाबला होणार आहे. कोरोनामुळे द्रविड दुबईला जाऊ शकला नाही. भारत-पाकिस्तान मॅचसाठी तो उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. कोरोना संसर्गाचे गांभीर्य सर्वांनाच माहिती आहे.  पण भारतीय क्रिकेट टीमचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Former India head coach Ravi Shastri) यांना कोरोना हा फ्लू वाटतोय. त्यांच्यामते आता परिस्थिती बदलली असून कोरोना आधी इतका गंभीर आजार राहिलेला नाही. यावरूनच त्यांनी राहुल द्रविड यांना सल्ला दिला आहे. काय म्हणाले शास्त्री? राहुल द्रविडला कोरोना झाल्याने भारतीय टीमने काळजी करू नये, तो 3-4 दिवसांत मैदानात परत येईल, असं शास्त्री म्हणाले आहेत. ’ मला वाटत नाही की राहुल द्रविडला कोरोना झाल्याने संघाच्या कामगिरीमध्ये फारसा फरक पडेल. तसंच आता त्याला कोविड-19 म्हणू नका, कारण तो फक्त फ्लू आहे. तो 3-4 दिवसांत ठीक होईल आणि मैदानात परत येईल,” असे रवी शास्त्री यांनी एशिया कप स्पर्धेबद्दल बोलताना स्टार स्पोर्ट्सला सांगितलं. या वेळी बोलताना शास्त्री यांनी गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर (England tour) जेव्हा त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, तेव्हाची आठवण सांगितली. इंग्लंड दौऱ्यावर असताना भारतीय टीममधील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे चौथी टेस्ट मॅच पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, तेव्हा  मी सहा दिवसांत ठीक झालो असतो आणि भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊ शकलो असतो, तर भारताने मँचेस्टरमधील टेस्ट मॅच जिंकून सीरिज 3-1 ने जिंकली असती, असा दावा शास्त्रींनी केलाय. ते म्हणाले, ‘गेल्या वर्षी जेव्हा मला कोरोना झाला होता तेव्हा मी 6 दिवसांत ड्रेसिंग रूममध्ये जाऊ शकलो असतो, तर मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो की, ती मॅच आम्ही ओल्ड ट्रॅफर्डवर खेळलो असतो आणि जिंकलो असतो.’ अनेक खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे ती मॅच वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली होती. यावर्षी एजबॅस्टनमध्ये झालेल्या या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आणि सीरिज 2-2 अशी बरोबरीत आली होती. मौका मौका! भारत विरुद्ध पाकिस्तान LIVE सामना मोबाईलवर कसा पाहता येणार? दरम्यान, द्रविडने काही पॅरॅसिटॅमॉल (Paracetamols) औषधाच्या गोळ्या घेतल्यानंतर तो बरा होईल आणि भारत-पाकिस्तानदरम्यान (India and Pakistan) होणाऱ्या मॅचसाठी टीमसोबत असेल, असं शास्त्री म्हणाले. ‘कोरोना, कोरोना करून आता कोरोनाबद्दल बोलू नका. तो फक्त फ्लू आहे. द्रविडने दोन पॅरॅसिटॅमॉल गोळ्या घेतल्या की तो भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या मॅचपर्यंत बरा होईल,’ असं शास्त्रींनी म्हटलंय. 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मॅचसाठी टीममधील बहुतांश खेळाडू मंगळवारी (23 ऑगस्ट 22) सकाळी मुंबईहून दुबईसाठी रवाना झाले. तर, उपकर्णधार के. एल. राहुल, दीपक हुडा आणि राखीव खेळाडू अक्षर पटेल झिम्बाब्वे दौरा  पूर्ण करून हरारे येथून दुबईला पोहोचतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात