मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान हा फक्त सामना किंवा एक खेळ नाही तर तो देशप्रेमापर्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याची आतूरता मोठी असते. टी २० वर्ल्ड कपनंतर आता आशिया कपमध्ये पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. टी २० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या टीमने भारताचा वाईट पराभव केला होता. त्याचा बदला आता टीम इंडिया आशिया कपमध्ये घेण्यासाठी सज्ज झाली आहे. २७ ऑगस्टपासून आशिया कपची सुरुवात UAE मध्ये होणार आहे. क्रिकेटप्रेमी हा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान आतापर्यंत ९ वेळा एकमेकांशी मैदानात भिडले आहेत. त्यापैकी ७ सामने भारताने जिंकले आहेत. पाकिस्तान केवळ दोन सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला आहे. भारताने आतापर्यंत 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तानचा 2 वेळा चॅम्पियन बनू शकला आहे. हा सामना कधी होणार, याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार यासोबत अनेक प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Asia Cup 2022: आधी बुमरा आता कोच राहुल द्रविड… आशिया चषकाआधी टीम इंडियाला दोन धक्के भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी? आशिया कपची सुरुवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना २८ ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. कुठे खेळवला जाणार सामना? दुबुई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. कुठे आणि किती वाजता पाहता येणार सामना? UAE मध्ये हा सामना असणार आहे. २८ ऑगस्टला संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना सुरू होईल. ७ वाजता टॉस होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे असणार? तुम्ही या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग Disney+Hotstar वर पाहू शकता टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.