मुंबई, 24 डिसेंबर: टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय (BCCI) वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.या विषयावर आजवर अनेकांनी मत व्यक्त केले आहे. पण, भारतीय क्रिकेटसोबत गेली काही वर्ष असलेल्या शास्त्रींनी यावर बोलणे टाळले होते. 'इंडियन एक्स्प्रेस'च्या 'ई अड्डा' कार्यक्रमात त्यांनी अखेर याबाबतचे मौन सोडले. शास्त्राींनी या वादामध्ये विराटची बाजू घेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
शास्त्री या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, 'माझ्या मते विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील वाद चांगल्या पद्धतीने सोडवता आला असता. विराट कोहलीनं या विषयावर त्याची बाजू मांडली आहे. आता बोर्डाने (सौरव गांगुली) त्यांची बाजू मांडण्याची गरज आहे.चांगल्या चर्चेतून परिस्थिती आणखी चांगली राहिली असती,' असे शास्त्राींनी स्पष्ट केले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरुन हटवण्याबाबत आपल्याला फक्त दीड तास आधी सांगण्यात आले, असा दावा विराटने केला आहे. त्याचबरोबर टी20 टीमची कॅप्टनसी न सोडण्याचा आपल्याला कुणीही दिला नव्हता, असे सांगत या विषयावर सौरव गांगुली यांनी केलेला दावा फेटाळून लावला.
IPL 2022: SRH ची जय्यत तयारी सुरू, 2 दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी
रोहित शर्माला पाठिंबा
रवी शास्त्रींनी यावेळी बोलताना रोहित शर्माला वन-डे टीमचा कॅप्टन करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. 'रोहित शर्मा आता टी20 टीमचा कॅप्टन आहे. व्हाईट बॉल टीमचा कॅप्टनही तोच हवा. विराटने टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला, त्याचवेळी रोहितचा कॅप्टन होण्याचा मार्ग मोकळा झाला.' असे शास्त्रींनी सांगितले. त्याचबरोबर विराट कोहलीनंच टेस्ट टीमची कॅप्टनसी करावी, तो टेस्टमधील सर्वश्रेष्ठ कॅप्टन आहे, असेही शास्त्रींनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Ravi shashtri, Sourav ganguly, Virat kohli