मुंबई, 27 जानेवारी : महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाला आयसीसी स्पर्धेची तीन विजेतेपद मिळवून दिली आहेत. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पण, आजही धोनीचे फॅन्स मोठ्या प्रमाणात आहेत. धोनीला बाईकची आवड असल्याचे त्याच्या फॅन्सना माहिती आहे. पण, तो स्वत: जवळ फोन ठेवत नाही, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी हा दावा केला.
रवी शास्त्रींनी पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याजवळ महेंद्रसिंह धोनीचा नंबर नाही, कारण तो स्वत: जवळ मोबाईल ठेवत नाही, असा दावा केला आहे. कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये संयम न सोडणारा धोनीारखा खेळाडू आजवर पाहिला नसल्याचं शास्त्रींनी या मुलाखतीमध्ये सांगितले.
लिजेंड्स लीगचे कमिशन असलेल्या शास्त्रींनी सांगितले की, 'धोनी सारखी व्यक्ती मी आजवर पाहिली नाही. त्याच्यावर अनेकदा विश्वास बसत नाही. तो नेहमीच स्थितप्रज्ञ असतो. शून्यावर आऊट झाला , 100 केले, वर्ल्ड कप जिंकला, पहिल्या फेरीत हरला तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही.
Ravi Shastri giving insights about Dhoni and Rohit pic.twitter.com/sQ9LAHAL8R
— Rishixvi (@Rishixvi) January 26, 2022
मी आजवर धोनीसारखा कुणीही पाहिलेला नाही. मी सचिनलाही पाहिलं आहे. तो असमान्य क्रिकेटपटू आहे. पण, कधी-कधी सचिनचाही संयम सुटतो. पण, धोनीचा नाही. तो त्याच्याजवळ फोन ठेवणे टाळतो. तो काहीही करू शकतो. आजपर्यंत माझ्याकडं धोनीचा फोन नंबर नाही. मी त्याला मागितलाही नाही. कारण, मला माहिती आहे की तो स्वत: जवळ मोबाईल ठेवत नाही, ' असा खुलासा शास्त्रींनी केला.
रोहित-राहुल बनवणार नवी टीम इंडिया, 2 खेळाडूंना लागली लॉटरी!
शास्त्रींनी पुढे विराट कोहलीबद्दलही सांगितलं. ' विराट मैदानात एखाद्या योद्धाप्रमाणे असतो. तो मैदानात उतरताच त्याला कशाची पर्वा नसते. तो समोरच्याशी स्पर्धा करतो. तो मैदानाच्याबाहेर एकदम विरुद्ध आहे. एकदम शांत आणि चिल आहे. तर रोहित शर्मा आरामात काम करणारा माणूस आहे. तो कोणतीही मॅच इतकी सोपी करतो की अनेकदा स्वत:वर विश्वास बसत नाही.' असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, MS Dhoni, Ravi shashtri