जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सलाम! मुलीवर अंत्यसंस्कार करून परतलेल्या भारतीय क्रिकेटपटूनं झळकावलं दमदार शतक

सलाम! मुलीवर अंत्यसंस्कार करून परतलेल्या भारतीय क्रिकेटपटूनं झळकावलं दमदार शतक

सलाम! मुलीवर अंत्यसंस्कार करून परतलेल्या भारतीय क्रिकेटपटूनं झळकावलं दमदार शतक

त्यानं शतकानंतर कोणतंही सेलिब्रेशन केलं नाही. त्याचं शरीर मैदानात होते, पण मन तिथं नव्हतं. त्याच्या लहान मुलीचं या मॅचपूर्वी निधन झालं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 फेब्रुवारी : रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji Trophy) बडोद्याचा बॅटर विष्णू सोळंकी ( Vishnu Solanki) याने शतक झळकावलं आहे. विष्णू चंदीगड विरूद्धच्या मॅचमध्ये  दुसऱ्या दिवसाअखेर 103 रन काढून नाबाद होता. त्याच्या शतकामुळे बडोद्याची टीम 400 रनच्या जवळ पोहचली आहे. विष्णूननं या शतकानंतर कोणतंही सेलिब्रेशन केलं नाही. त्याचं शरीर मैदानात होते, पण मन तिथं नव्हतं. त्याच्या लहान मुलीचं या मॅचपूर्वी निधन झालं होतं. विष्णूनं गेल्या काही दिवसांमध्ये एक वडील आणि क्रिकेटपटू म्हणून त्याची जबाबदारी पूर्ण केली आहे. मुलीचे निधन झाल्याचा मोठा धक्का विष्णूला बसला होता. हे दु:ख पचवून तो टीममध्ये परतला. बडोद्याकडून पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या विष्णूनं 161 बॉलमध्ये 12 फोरच्या मदतीनं शतक झळकावलं. विष्णूच्या या खेळीद्दल प्रत्येक जण त्याला सलाम करत आहे. केकेआरचा क्रिकेटपटू शेल्डन जॅक्सन, मुंबईचे माजी क्रिकेटपटू शिशिर हट्टंगडी यांनी ट्विट करत विष्णूच्या धौर्याची प्रशंसा केली आहे.

जाहिरात

‘हिंदुस्थान टाईम्स’नं दिलेल्या वृत्तानुसार  11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री विष्णूच्या मुलीचा जन्म झाला. मुलगी झाल्याचा त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या 24 तासांमध्ये तिच्या मुलीनं या जगाचा निरोप घेतला. विष्णू त्यावेळी रणजी स्पर्धा खेळण्यासाठी भुवनेश्वरमध्ये होता. मुलीच्या निधनाचे वृत्त समजताच तो तातडीने बडोद्याला गेला. मुलीवर अंत्यसंस्कर करून तो तीन दिवसांमध्ये टीममध्ये परतला आणि त्याने शतक झळकावले. ऋद्धीमान साहा धमकी प्रकरण BCCI च्या कोर्टात, विशेष समिती करणार चौकशी विष्णूच्या शतकामुळे चंदीगडच्या 168 रनला उत्तर देताना बडोद्यानं 7 आऊट 398 असं चोख उत्तर दिलं. दुसऱ्या दिवसअखेरीसच बडोद्याकडं 230 रनची भक्कम आघाडी होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात