जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ranji : सचिन तेंडुलकरलाही जमलं नाही ते दिल्लीच्या 19 वर्षांच्या खेळाडूनं करून दाखवलं!

Ranji : सचिन तेंडुलकरलाही जमलं नाही ते दिल्लीच्या 19 वर्षांच्या खेळाडूनं करून दाखवलं!

Ranji : सचिन तेंडुलकरलाही जमलं नाही ते दिल्लीच्या 19 वर्षांच्या खेळाडूनं करून दाखवलं!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा क्रिकेट विश्वातील सर्वात महान क्रिकेटपटू आहे. क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत. पण, दिल्लीच्या 19 वर्षाच्या मुलानं एका बाबतीमध्ये सचिनला जमलं नाही ते केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 फेब्रुवारी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा क्रिकेट विश्वातील सर्वात महान क्रिकेटपटू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक झळकवणारा सचिन हा एकमेव खेळाडू आहे. त्याचबरोबर वन-डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्डही सचिनच्या नावावर आहे. क्रिकेटमधील अनेक विक्रमांना सचिननं गवसणी घातली. काही आजही त्याच्या नावावर आहेत. पण, सचिनलाही न जमलेला एक रेकॉर्ड टीम इंडियाचे भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीकर खेळाडूनं केला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दिल्लीचा ओपनर आणि अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन यश ढूलनं (Yash Dhull) हा रेकॉर्ड केला आहे. यशनं तामिळनाडू विरूद्धच्या मॅचमध्ये (Delhi vs Tamil Nadu) रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. . त्याने पदार्पणातील मॅचमध्येच पहिले शतक 133 बॉलमध्ये पूर्ण केले. तामिळनाडूच्या सर्व बॉलर्सचा त्याने समाचार घेतला. यश अखेर 150 बॉलमध्ये 113 रन काढून आऊट झाला. या खेळीत त्याने 18 फोर लगावले.  यशच्या शतकामुळे दिल्लीनं पहिल्या इनिंगमध्ये 452 पर्यंत मारली. यशचा धडाका दुसऱ्या इनिंगमध्येही कायम आहे. त्याने दुसऱ्या इनिंगमध्येही अर्धशतक पूर्ण केले आहे. पदार्पणातील रणजी मॅचमधील दोन्ही इनिंगमध्ये 50 पेक्षा  जास्त रन करण्याचा रेकॉर्ड सचिनलाही जमला नव्हता. याबाबतीमध्ये यशनं सचिनला मागे टाकलं आहे. विराट-पंत टीम इंडियाच्या बाहेर, पाहा शेवटच्या मॅचमध्ये कशी असेल Playing 11 सचिनची पदार्पणातील कामगिरी सचिननं 10 ते 12 डिसेंबर 1988 रोजी गुजरात विरूद्ध वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या मॅचमध्ये पदार्पण केले होते. सचिननंही पदार्पणातील मॅचमध्ये शतक झळकावले होते. त्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करणारी गुजरातची टीम 140 रनवरच ऑल आऊट झाली होती. त्याला उत्तर देताना मुंबईकडून चौथ्या क्रमांकावर आलेल्या सचिननं  एकट्यानंच 100 रनची खेळी केली होती. सचिनच्या शतकामुळे मुंबईनं पहिली इनिंग 6 आऊट 394 रनवर घोषित केली. त्यानंतर गुजरातनं दुसऱ्या इनिंगमध्ये अधिक प्रतिकार करत 306 पर्यंत मारली. मुंबईला विजयासाठी शेवटच्या दिवशी 7 ओव्हरमध्ये 53 रनची गरज होती. मुंबईनं 7 ओव्हर्समध्ये 2 आऊट 43 रन केले. त्यामुळे ती मॅच ड्रॉ झाली. सचिनला दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटींग करण्याची संधी मिळालीच नाही. अशा पद्धतीने सचिननं रणजी स्पर्धेतील पदार्पणातील मॅचमध्ये 100 रन केले होते. दिल्लीच्या यश ढूलनं याबाबातीत सचिनला बरंच मागं टाकलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात