जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / बांबूची बॅट बॉलरची वाढवू शकते डोकेदुखी; बिग हिटिंगसाठी BEST आहे हा पर्याय, संशोधनातून उघड

बांबूची बॅट बॉलरची वाढवू शकते डोकेदुखी; बिग हिटिंगसाठी BEST आहे हा पर्याय, संशोधनातून उघड

बांबूची बॅट बॉलरची वाढवू शकते डोकेदुखी; बिग हिटिंगसाठी BEST आहे हा पर्याय, संशोधनातून उघड

क्रिकेटमधील बॅटच्या (Cricket Bat) निर्मितीकरिता वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक इंग्लिश विलोला (Salix alba)एक मजबूत प्रतिस्पर्धी मिळाला आहे.

    नवी दिल्ली, 11 मे : क्रिकेटमधील बॅटच्या (Cricket Bat) निर्मितीकरिता वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक इंग्लिश विलोला (Salix alba) एक मजबूत प्रतिस्पर्धी मिळाला आहे. जर ब्रिटनने लावलेल्या शोधावर विश्वास ठेवला तर या दाव्यानुसार, बांबूपासून तयार केलेली क्रिकेट बॅट ही विलोला पर्याय ठरु शकते तसेच तिचा स्वीट स्पॉटही अधिक चांगला आहे. तसेच ही बॅट अधिक टिकाऊ आहे. केम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधनानुसार, विलोच्या लाकडाच्या तुलनेत बांबू (Bamboo) हा 22 टक्के अधिक टणक असतो. त्यामुळे बॉल बॅटवर आदळल्यानंतर तो बऱ्याच वेगाने परतू शकतो. त्याचबरोबर या बॅटचा स्वीट स्पॉट (बॉल मारल्यानंतर बॉल वेगाने जाण्याची जागा) खूपच चांगला आहे. याचा विचार केला तर भविष्यात बांबूची बॅट चांगली कमाल करेल असे म्हणायला निश्चितच हरकत नाही. कॅम्ब्रिज सेंटर फॉर नॅचरल मटेरियल इनोव्हेशनचे डॉ दर्शिल शाह यांनी सांगितले की, हे बांबूपासून बनवलेल्या क्रिकेट बॅटच्या स्वीट स्पॉट (Sweet Spot)मुळे यॉर्करवर चौकार मारणे अधिक सुलभ जाते. हे प्रत्येक बॅटसमन चे स्वप्न असते. परंतु सर्व प्रकारच्या स्ट्रोकसाठी ही बॅट चांगली आहे. खेळ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार,एक क्रिकेट बॅट ही चिरलेल्या बांबूपासून तयार केली जाते. पारंपारिक विलो पासून बनवलेल्या बॅटच्या तुलनेत या बॅटचे घनत्व खूपच कमी असते. हे ही वाचा- अमेरिकेत क्रिकेट खेळण्याच्या दाव्यावर भारताच्या माजी कॅप्टनचं स्पष्टीकरण… विलोच्या तुलनेत बांबूपासून तयार केलेल्या बॅटस अधिक जड आहेत. परंतु,स्वतः डॉ.शाह 19 वर्षाखालील संघातील क्रिकेटपटू आहेत. याबाबत ते म्हणाले,की परिस्थितीशी जुळवून घेणारी बॅट आम्ही विकसित करीत आहोत. चिरलेल्या बांबूपासून बनवलेल्या बॅटचा वापर केल्यास क्रिकेट अधिक टिकाऊ खेळ होईल,आणि त्याचे जागतिक आकर्षणही वाढेल,असा दावा संशोधनात करण्यात आला आहे. विलोचा घटता पुरवठा,जागतिक स्तरावरील वाढते क्रिकेट यामुळे बॅटसची मागणी वाढली आहे. अशा स्थितीत चिरलेल्या बांबूपासून बॅटसची निर्मिती करणे उपयुक्त ठरणार आहे. तसेच बांबूची बॅट हा चांगला पर्याय ठरु शकेल कारण ही बॅट तुलनेने स्वस्त आहे. विलो परिपक्व होण्यासाठी किमान 15 वर्षे लागतात त्यातुलनेने बांबू हा 7 वर्षात परिपक्व होतो. म्हणजेच बांबूची वाढ लवकर होते आणि तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो. गार्डीयन ला दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. दर्शिल शाह यांनी सांगितले की चीन,जपान आणि दक्षिण अमेरिका सारख्या क्रिकेटचा अवलंब करणाऱ्या देशांमध्येही हे प्रचलित आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: cricket
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात