मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: जोफ्रा आर्चरचे 6 वर्षांपूर्वीचे ट्विट का होत आहे Viral?, वाचा कारण

IPL 2021: जोफ्रा आर्चरचे 6 वर्षांपूर्वीचे ट्विट का होत आहे Viral?, वाचा कारण

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) स्थगित करावी लागलेली आयपीएल 2021 स्पर्धा (IPL 2021) यूएईमध्ये होणार आहे. बीसीसीआयनं हा निर्णय जाहीर करताच जोफ्रा आर्चरचं (Jofra Archer) एक जुनं ट्विट व्हारयल (Viral) झाले आहे.

मुंबई, 30 मे: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) स्थगित करावी लागलेली आयपीएल 2021 स्पर्धा (IPL 2021) यूएईमध्ये होणार आहे. बीसीसीआयच्या शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये उर्वरित 31 सामने यूएईमध्ये घेण्याचा एकमताने निर्णय झाला. उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक आणखी जाहीर केलेलं नाही, मात्र हे सामने सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरु होणार असल्याचा निर्णय सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला.

बीसीसीआयनं युएईमध्ये आयपीएल घेण्याचा निर्णय जाहीर करताच सोशल मीडियावर मीमचा पूर आला होता. राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचे 6 वर्ष जूने ट्विट पुन्हा एकदा व्हायरल (Viral) झाले आहे. राजस्थान रॉयल्सनं आर्चरच्या या ट्विटची दखल घेत क्रिकेट फॅन्सना आयपीएल पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती दिली.

जोफ्रा आर्चरचं एखादं ट्विट व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याच्या अनेक जुन्या ट्विटचे आजच्या काळात संदर्भ सापडतात.आर्चरने 2015 सााली दुबईमध्ये जायचं आहे, हे ट्विट केलं होतं. राजस्थान रॉयल्सने हे रिट्विट करत 'तुला माहिती होतं जोफ्रा' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेतील पूर्वार्धात 7 पैकी 3 सामने जिंकले असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत.  राजस्थानचा पहिल्या सामन्यात पंजाब विरुद्ध 4 रनने निसटता पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या सामन्या ख्रिस मॉरीसने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले.

'त्या' फोटोतील चेहरा का लपवला? इराफान पठाणच्या पत्नीनं सांगितलं कारण

त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थानचा पराभव झाला. सलग दोन पराभवानंतर राजस्थाननं सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विजय मिळवला. तर मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यांचा पराभव झाला.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Jofra archer, Rajasthan Royals