मुंबई, 30 मे: टीम इंडियाचा ऑल राऊंडर इरफान पठाणला (Irfan Pathan) त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे बरीच टीका सहन करावी लागली. त्याा फोटोमध्ये इराफनने त्याच्या मुलाला खांद्यावर घेतले आहे. त्याच्यासोबत पत्नी सफा बेग (Safa Baig) देखील आहे. मात्र तिचा चेहरा अस्पष्ट करण्यात आला आहे.
इराफनला काही युझर्सनी पत्नीला बरोबरीची वागणूक देण्याचा सल्ला दिला. हा वाद वाढत चालल्याचं लक्षात येताच इराफानला सोशल मीडियावर याचे उत्तर देणे भाग पडले. इराफनने तो फोटो ट्विट करत म्हंटले आहे की, ' हा फोटो माझ्या रानीने (पत्नी) मुलाच्या अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. या फोटोवरुन आम्हाला अनेकांचा द्वेष सहन करावा लागत आहे. माझ्या पत्नीने तिच्या मर्जीने स्वत:चा चेहरा ब्लर केला आहे. मी तिचा मालक नाही तर जोडीदार आहे.' असे इराफानने सांगितले.
इराफानच्या या स्पष्टीकरणानंतर प्रथमच सफा बेगनं 'त्या' फोटोत चेहरा का अस्पष्ट केला याचे कारण सांगितले आहे. सफाने 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना सांगितले की, "मी माझा मुलगा इमरानचं इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले आहे. त्यावर मी पोस्ट करत असते. तो मोठा झाल्यावर त्याला काही चांगल्या आठवणी पाहता येतील, या उद्देशानं मी त्याचे अकाऊंट अपडेट करते. तो फोटो मी माझ्या मर्जीने अस्पष्ट केला होता. तो पूर्णपणे माझा निर्णय होता. त्याचा इरफानशी काहीही संबंध नाही.''
कोहलीचं Live सुरू असतानाच अनुष्कानं विचारला प्रश्न, विराटपेक्षा अभिनेत्रीचीच रंगली चर्चा
इरफानने दिला होता पाठिंबा
सफाने पुढे सांगितले की, "एक कौटुंबिक फोटो शेअर केल्यानंतर त्यावर विनाकारण वाद झाला. मला आयुष्य अत्यंत खासगी ठेवायला आवडते. मला कधीही आकर्षणाचा केंद्रबिंदू होणे आवडत नाही." इराफानचा बचाव करताना तिने सांगितले की, ''मी सौदी अरेबियातून भारतामध्ये आली आहे. लग्नानंतर 2016 साली पासपोर्ट ऑफिसमध्ये मी माझ्या आडनावाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला इराफाने पाठिंबा दिला होता." कोणत्याही प्रकारचे ट्रोलिंग कधीही अयोग्य असल्याचं तिने यावेळी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Viral photo