मुंबई, 29 नोव्हेंबर: आयपीएल स्पर्धा गाजवणारा भारतीय क्रिकेटपटू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) याने लग्न केले आहे. रिद्धी पन्नू असं राहुलच्या बायकोचं नाव आहे. त्यांच्या लग्नाला टीम इंडियाचा विकेट किपर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) बॅटर नितिश राणा देखील उपस्थित होते. 28 वर्षांच्या राहुलनं आयपीएलमधील खेळानं सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
राहुल तेवतियाचा टी20 मॅचमधील रेकॉर्ड चांगला आहे. त्याची एकदा टीम इंडियासाठी निवड देखील झाली होती, पण तो फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही. राहुलनं आजवर 87 T20 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 7.42 च्या इकोनॉमी रेटनं 54 विकेट्स काढल्या आहेत. त्याचबरोबर 142.33 च्या स्ट्राईक रेटनं आणि 27.20 च्या सरासरीनं 1170 रन काढले आहेत.
IND vs NZ: न्यूझीलंडच्या 'नाईट वॉचमन'नं दमवलं, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
आयपीएल 2020 मध्ये (IPL 2020) पंजाबच्या शेल्डन कॉट्रेलच्या एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स लगावल्यानं तेवातिया चर्चेत आला होता. पंजाबविरुद्धच्या त्या मॅचमध्ये 224 रनचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची टीम अडचणीत आली होती. त्यावेळी तेवातियानं 31 बॉलमध्ये 53 रन काढले. या खेळीत त्यानं सात सिक्स लगावत राजस्थानला सनसनाटी विजय मिळवून दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket