VIDEO : बेन स्टोक्सच्या तोंडावर पत्नीनं मारलं पाणी, पाहा पुढे काय झालं

VIDEO : बेन स्टोक्सच्या तोंडावर पत्नीनं मारलं पाणी, पाहा पुढे काय झालं

कोरोनामुळे घरातच असलेले खेळाडू आता त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. यादरम्यान काही मजेशीर व्हिडिओ क्रिकेटपटूंनी शेअर केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाउन झालं आहे. क्रिडा क्षेत्रात मोठ्या स्पर्धांचे आय़ोजन रद्द करण्यात आलं आहे. तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात फुटबॉल, टेनिस, क्रिकेट स्पर्धांचा समावेश आहे. क्रिकेटमध्ये आयपीएल पुढे ढकलण्यात आली असून भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट मालिका रद्द केली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात अशी वेळ कधीच आलेली नव्हती.

स्पर्धांचे आयोजन नसल्यानं खेळाडू आता निवांत घरीच आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवत असून ते बाहेरही पडत नाही. इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सनं ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यानं पत्नीसोबतचा हा व्हिडिओ टाकला आहे. यात स्टोक्सची पत्नी त्याच्यावर पाणी टाकताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

चीनच्या वुहान प्रांतातून जगभर पसरलेल्या कोरोनामुळे अनेक देशांत भीतीचं वातावरण आहे. लोकांना ताप, कोरडा खोकला यासारखा त्रास होत आहे. जगात अनेक देशांमध्ये प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. अनेक देशांनी सीमा बंद केल्या आहेत.

क्रिकेटपटूंनी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. भारत दौऱ्यावरून परतलेले दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू 14 दिवस क्वारंटाइन राहणार आहेत. खबरदारी म्हणून त्यांना वेगळं ठेवण्यात येणार आहे. तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानं पीएसल 5 मधून त्यांच्या क्रिकेटपटूंना मायदेशी बोलावलं आहे.

हे वाचा : क्रिकेटपटू स्वप्नात पत्नीला देतो शिव्या, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

First published: March 19, 2020, 6:10 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या