मुंबई, 19 ऑगस्ट: टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं (Rahul Dravid) नॅशनल क्रिकेट अकादामीच्या संचालकपदासाठी पुन्हा अर्ज केलाय. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होणार अशी चर्चा सुरु आहे. याचे कारण म्हणजे टीम इंडियाचा हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) या पदासाठी पुन्हा अर्ज करणार नाही, हे वृत्त प्रसिद्ध झालं आहे. पण द्रविडनं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदासाठी पुन्हा अर्ज केल्यानं तो टीम इंडियाचा कोच होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार द्रविडनं एनसीएच्या संचालक पदासाठी पुन्हा एकदा अर्ज केला आहे. या संस्थेचा चेहरा बदलण्यासाठी त्यानं मोठं काम केलं आहे. त्यामुळे त्याची या पदावर पुन्हा एकदा राहण्याची इच्छा आहे. या पदासाठी द्रविडच्या शिवाय कोणत्याही मोठ्या नावानं अद्याप अर्ज केलेला नाही. त्यामुळे त्याला दोन वर्षांची मुदतवाढ मिळू शकते अशी माहिती या सूत्रांनी दिली आहे. या पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट होती. मात्र या अर्जासाठी आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.
टी 20 वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाची तयारी सुरु झाली आहे. युएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच भरत अरुण, फिल्डिंग कोच आर. श्रीधर आणि बॅटींग कोच विक्रम राठोड भारतीय टीमपासून वेगळं होण्याची शक्यता आहे. शास्त्रीनं बीसीसीआयच्या काही सदस्यांना याबाबतची सूचना दिली आहे. त्याचबरोबर अन्य कोचिंग स्टाफची देखील आयपीएल टीमबरोबर चर्चा सुरू आहे. असं वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झालं आहे.
IND vs ENG : 'बुमराहाला मैदानात राग आला पाहिजे', झहीर खानचा अजब सल्ला
चक्रवर्ती, गिलबाबत होणार निर्णय
शुभमन गिल, वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नागरकोटी हे दुखापतग्रस्त खेळाडू एनसीएमध्ये दाखल झाले आहे. या तीन्ही खेळाडू कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचे सदस्य आहेत. त्यांना आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. या फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच हे खेळाडू केकेआरच्या टीमसोबत यूएईला रवाना होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Rahul dravid