मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 'बुमराहाला मैदानात राग आला पाहिजे', झहीर खानचा अजब सल्ला

IND vs ENG : 'बुमराहाला मैदानात राग आला पाहिजे', झहीर खानचा अजब सल्ला

लॉर्ड्स टेस्टमध्ये घडलेल्या एका घटनेनं भारतीय क्रिकेट फॅन्स नाही तर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मैदानात नेहमी शांत असणारा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाचव्या दिवशी चांगला संतापला होता.

मुंबई, 18 ऑगस्ट : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियानं इंग्लंडचा (India vs England 2nd Test) 151 रननं पराभव केला आहे. पाचव्या दिवशी सकाळी या मॅचचं पारडं इंग्लंडच्या बाजूनं झुकलं होत. त्यावेळी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या जोडीनं 89 रनची नाबाद भागिदारी करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं.

लॉर्ड्स टेस्टमध्ये घडलेल्या एका घटनेनं भारतीय क्रिकेट फॅन्स नाही तर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मैदानात नेहमी शांत असणारा जसप्रीत बुमराह पाचव्या दिवशी चांगला संतापला होता. त्यानंतर बुमराबनं आक्रमक खेळ केला. त्यानं भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 34 रन तर काढलेच. त्याचबरोबर 33 रन देत 3 विकेट्सही घेतल्या. त्याचे हे आक्रमक रुप टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खानला (Zaheer Khan) भलंतच आवडलं आहे.

झहीर खाननं 'क्रिकबझ'शी बोलताना सांगितले की, 'बुमराहला राग आल्यानंतर तो असं प्रदर्शन करणार असेल तर त्याला यापुढेही राग आला पाहिजे. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. ही गोष्ट बुमराहला खटकत असणार. त्यानंतर मैदानात अँडरसनसोबत त्याचा जो संवाद झाला त्यानंतर इंग्लंडचे सर्व खेळाडू त्याच्या मागे पडले होते. मैदानातील या गोष्टी चांगली कामगिरी करण्यास प्रेरणा देतात. बुमराहनं रागाचा उपयोग योग्य ठिकाणी केला. आता इंग्लंड या गोष्टीवर विचार करत असेल.' असे त्याने स्पष्ट केले.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये हे काय सुरू आहे? VIDEO पाहून बसणार नाही विश्वास

मैदानात काय घडले होते?

लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी जसप्रीत बुमराहवर (Jasprit Bumrah) निशाणा साधला. बुमराहविषयी इंग्लंडच्या खेळाडूंनी अपशब्द वापरल्यानंतर भारतीय खेळाडूही भडकले, यानंतर बुमराह आणि बटलरमध्ये (Jos Butller) बाचाबाची झाली. अखेर अंपायरना मध्ये पडावं लागलं. बुमराह इंग्लंडच्या खेळाडूंशी पंगा घेत असल्याचं पाहून ड्रेसिंग रूममध्ये असलेला कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) आक्रमक झाला होता.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england, Jasprit bumrah