Home /News /sport /

जेव्हा द्रविडनं धोनी आणि पठाणला दाखवला सिनेमा, इराफाननं सांगितला 'तो' किस्सा

जेव्हा द्रविडनं धोनी आणि पठाणला दाखवला सिनेमा, इराफाननं सांगितला 'तो' किस्सा

टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडची (Rahul Dravid) मैदानात आणि मैदानाच्या बाहेर शांत आणि संयमी व्यक्ती अशी ओळख आहे. माजी ऑल राऊंडर इरफान पठाणनं (Irfan Pathan) द्रविडचा आजवर न ऐकलेला किस्सा सांगितला आहे.

    मुंबई, 4 जुलै: टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडची (Rahul Dravid) मैदानात आणि मैदानाच्या बाहेर शांत आणि संयमी व्यक्ती अशी ओळख आहे. श्रीलंकेला 3 वन-डे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेलेल्या टीमचा द्रविड कोच आहे. गेल्या पाच वर्षात अनेक तरुण खेळाडूंचा शोध घेण्याचं काम द्रविडनं केलं आहे. हे खेळाडू आता टीम इंडियासाठी खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (VVS Laxman) आणि इराफान पठाण (Irfan Pathan) यांनी द्रविड सोबत बराच काळ क्रिकेट खेळलं आहे. त्यांना त्याच्या स्वभवाची चांगली माहिती आहे. इराफाननं नुकताच द्रविडचा आजवर न ऐकलेला किस्सा सांगितला. राहुल द्रविडच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया वर्ल्ड कप 2007 मध्ये साखळी फेरीतच आऊट झाली होती. बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात आले होते. या पराभवानंतरचा एक किस्सा इराफाननं सांगितला आहे. द्रविडनं दाखवला सिनेमा "मला 2007 मधील वर्ल्ड कपच्या दरम्यान घडलेला एक प्रसंग आजही आठवतो. द्रविड, माझ्याकडं आणि धोनीकडं आला होता. आपण सर्वजण पराभवामुळे निराश आहोत. आपल्याला एक सिनेमा पाहिला पाहिजे, असा प्रस्ताव त्याने ठेवला. द्रविड नेहमीच तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करतो आणि त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देतो. 2007 मधील पराभवानंतरही एक कॅप्टन म्हणून त्याने टीमला हेच सांगितले. हा पराभव म्हणजे शेवट नाही. आयुष्य खूप मोठं आहे, आपण नक्की पुनरागमन करू, असे द्रविडने म्हंटले होते," अशी आठवण इराफाननं सांगितली आहे. IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला धक्का, दिग्गज खेळाडूची स्पर्धेतून माघार द्रविडसोबत ऐतिहासिक भागिदारी केलेला त्याचा पार्टनर व्ही.व्ही. एस लक्ष्मणने यावेळी सांगितले की, 'प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडवर दबाव नसेल, कारण त्याला युवा खेळाडूंसोबत काम करण्याचा अनुभव आहे. त्याला खेळाडूंना भविष्यातले चॅम्पियन करण्याची संधी आहे. प्रत्येकाला या दौऱ्यात खेळण्याची संधी मिळेल, असं नाही, पण द्रविडसोबत वेळ घालवल्याचा प्रत्येकाला फायदा होईल,' असं वक्तव्य लक्ष्मणने केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Rahul dravid, Sports

    पुढील बातम्या