मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला धक्का, दिग्गज खेळाडूची स्पर्धेतून माघार

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला धक्का, दिग्गज खेळाडूची स्पर्धेतून माघार

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) स्थगित झालेला आयपीएल स्पर्धेचा (IPL 2021) 14 वा सिझन सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये सुरु होणार आहे. हा सिझन सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) एक मोठा धक्का बसला आहे.

मुंबई, 4 जुलै: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) स्थगित झालेला आयपीएल स्पर्धेचा (IPL 2021) 14 वा सिझन सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये सुरु होणार आहे. या टप्प्यात अनेक मोठे खेळाडू गैरहजर राहणार आहेत. सध्या पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टिव्ह स्मिथनं (Steve Smith) उर्वरित सिझनमधून माघार घेतली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्स (RR) टीमचा माजी कॅप्टन असलेल्या स्मिथ या सिझनमध्ये पहिल्यांदाच दिल्लीकडून खेळतो आहे. या सिझनमध्ये आपण पेन किलर घेऊन खेळल्याचा खुलासा स्मिथनं केला आहे. ‘माझ्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे मी 100 टक्के योगदान देऊ शकलो नाही. या दुखापतीनं मला आयपीएल स्पर्धेत बराच त्रास दिला. मी बॅटींग करण्यासाठा पेन किलर घेऊन मैदानात उतरत असे,’’ असे स्मिथने सांगितले. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी स्मिथनं 6 मॅचमध्ये 111.82 च्या सरासरीनं 104 रन काढले आहेत.

वर्ल्ड कपमधूनही माघार?

स्टिव्ह स्मिथनं या दुखापतीमुळे आपण टी-20 वर्ल्ड कपमधून माघार घेऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. टी-20 वर्ल्ड कपला अजून वेळ आहे. दुखापतीतून मी बरा होत आहे. टी-20 टीममध्ये सहभागी व्हायला मला आवडेल, पण माझ्यासाठी टेस्ट क्रिकेट सर्वाधिक महत्त्वाचं आहे. ऍशेससाठी फिट होणं माझं लक्ष्य आहे.

SA vs WI : अंपायरनं केली मोठी चूक! आफ्रिकेच्या दिग्गजांना बसला धक्का

मागच्या काही ऍशेसमध्ये मी जशी कामगिरी केली, त्याचीच पुनरावृत्ती करण्याची माझी इच्छा आहे. यासाठी मला टी-20 वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागली तरी चालेल, पण तसं करण्याची माझी इच्छा नाही,' असं स्मिथने क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना सांगितलं. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Cricket news, Delhi capitals, IPL 2021, Steven smith