जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / PAK vs WI: बाबर आझमची चालाखी उघड, अंपायरनं दिली संपूर्ण टीमला शिक्षा

PAK vs WI: बाबर आझमची चालाखी उघड, अंपायरनं दिली संपूर्ण टीमला शिक्षा

PAK vs WI: बाबर आझमची चालाखी उघड, अंपायरनं दिली संपूर्ण टीमला शिक्षा

पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं (Babar Azam) भर मैदानात चालाखी केली. त्याच्या या चालाखीची शिक्षा संपूर्ण टीमला सहन करावी लागली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जून :  पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. त्यानं नुकतीच वन-डे क्रिकेटमध्ये शतकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. त्याच्या फॉर्मचा टीमलाही उपयोग होत आहे. शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये पाकिस्ताननं वेस्ट इंडिजचा 120 रननं पराभव केला. या विजयासह पाकिस्ताननं या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. त्याचवेळी बाबर आझमनं मॅचच्या दरम्यान एक चूक केली. ती पाहून त्याला क्रिकेटच्या नियमांची माहिती नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे. काय घडला प्रकार? वेस्ट इंडिजच्या इनिंगमधील 29 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी वेस्ट इंडिजचा स्कोर 7 आऊट 131 असा होता आणि मॅचवर पाकिस्तानची पूर्ण पकड होती. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजनं ती ओव्हर टाकली. त्या ओव्हरचा पहिला बॉल अल्झारी जोसेफनं लेग साईडला टोलावला आणि तो एक रनसाठी पळाला. त्यावेळी बाबरनं तो बॉल अडवून फिल्डरकडं फेकला. बाबरनं तो बॉल फेकताना एक चूक केली. त्यानं उजव्या हातामध्ये विकेट किपर मोहम्मद रिझवानचे ग्लोज घालून थ्रो केला.

जाहिरात

बाबरची ही कृती क्रिकेटचा नियम मोडणारी होती. मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या नियम क्रमांक 28.1 नुसार विकेट किपरचा अपवाद वगळता कोणत्याही फिल्डरला मैदानात ग्लोज  वापरायला परवानगी नाही. त्याचबरोबर हाताच्या बोटांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गार्ड घालण्यासाठी अंपायरच्या नियमांची परवानगी आवश्यक आहे. IPL संपल्यावर दिग्गज खेळाडूने स्वत:लाच गिफ्ट केली कार, Video शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट बाबर आझमनं हा नियम मोडला. त्याला नियमांची माहिती असेल तर मैदानात चालाखी करण्याचा प्रयत्न करत होता, असा याचा अर्थ निघतो. अंपायर्सनी त्याची चालाखी लगेच पकडली आणि त्यांनी पेनल्टी म्हणून वेस्ट इंडिजला 5 रन बहाल केले. अर्थात याचा मॅचच्या निकालावर काही परिणाम झाला नाही. वेस्ट इंडिजची संपूर्ण इनिंग 155 रनवर संपुष्टात आली आणि पाकिस्ताननं हा सामना 120 रननी जिंकला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात