मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीमनं Review गमवातच अंपायरनं केला जल्लोष, पाहा मजेदार VIDEO

टीमनं Review गमवातच अंपायरनं केला जल्लोष, पाहा मजेदार VIDEO

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये एक मजेदार प्रसंग घडला आहे.या मॅचमध्ये कराची किंग्सनं त्यांचा Review गमावताच प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंनी नाही तर मैदानात उपस्थित असलेल्या अंपायरनं जल्लोष केला.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 26 फेब्रुवारी : क्रिकेटच्या मैदानातील अंपायरचा (umpire) निर्णय मान्य नसेल, तर दोन्ही टीमना त्या विरोधात थर्ड अंपायरकडे (third umpire) दाद मागण्याचा अधिकार आहे. थर्ड अंपायरचा निर्णय मनासारखा आला तर ती मॅच खेळणारे खेळाडू किंवा ती मॅच पाहणारे प्रेक्षक जल्लोष करण्याचे प्रसंग नेहमीचे आहेत. थर्ड अंपायरने कोणताही निर्णय दिला तरी प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित असलेले अंपायर त्यावर कोणतीही ठळक प्रतिक्रिया देत नाहीत. ते फक्त थर्ड अंपायरच्या निर्णयाची अंमलबजावणी करतात. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या पाकि(Kस्तान सुपर लीग (PSL) मध्ये एक मजेदार प्रसंग घडला आहे. पीएसलमध्ये कराची किंग्स (Karachi Kings) विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड (Islamabad United) ही मॅच नुकतीच झाली. या मॅचमध्ये कराची किंग्सनं त्यांचा (Review) गमावताच प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंनी नाही तर मैदानात उपस्थित असलेल्या अंपायरनं जल्लोष केला. काय घडला प्रसंग? इस्लामाबादला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये एक रन हवा होता. त्यांनी तो आरामात पूर्ण केला, पण इस्लामाबादच्या फॅन्सनं थोड्या वेळानं याचा आनंद साजरा केला. याच कारण म्हणजे कराची किंग्सनं या बॉलवर Review घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी थर्ड अंपायरनं पाहिलेल्या रिप्लेमध्ये बॉल आधी बॅटला लागला होता, हे स्पष्ट दिसलं. त्यामुळे मैदानातील अंपायरची यामध्ये कोणतीही चूक नव्हती. तिसऱ्या अंपायरनं हा निर्णय देताच बॅट्समनला नॉट आऊट देण्याचा निर्णय देणारे अंपायर अलिम दार (Aleem Dar) त्यांचा आनंद लपवू शकले नाहीत. अलीम दार यांनी मैदानातच या निर्णयाचं सेलिब्रेशन केलं. त्यांच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. Aleem Dar Thug Life Moment at the End when they lost the review pic.twitter.com/boldCdV4S7 — Taimoor Zaman (@taimoorze) February 24, 2021 (वाचा : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं स्पर्धेतील दुसरं शतक, टीम इंडियातील जागेवर केला दावा ) इस्लामाबादनं कराचीचा पाच विकेट्सनं पराभव करुन स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. कराचीच्या शर्जील खानची 59 बॉलमध्ये 105 रनची खेळी व्यर्थ ठरली.
First published:

Tags: Cricket, Cricket news, Islamabad united, Pakisatan, Sports, Video viral

पुढील बातम्या