जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / MCC ने नियम बदलला, पण बॅटरवरच भडकला डेव्हिड वॉर्नर

MCC ने नियम बदलला, पण बॅटरवरच भडकला डेव्हिड वॉर्नर

David Warner

David Warner

मेरिलबोन क्रिकेट क्लबने (MCC) क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. एमसीसीने बदललेल्या या नियमांमुळे ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) नाराज झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कराची, 10 मार्च : मेरिलबोन क्रिकेट क्लबने (MCC) क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. ही संस्था क्रिकेटचे नियम बनवते आणि असलेल्या नियमांमध्ये बदल करते, यानंतर आयसीसी हे नियम स्वीकारते. एमसीसीने बदललेल्या नव्या नियमानुसार आता नॉन स्ट्रायकर एण्डला उभा असलेला बॅटर बॉल टाकण्याच्या आधीच क्रीज सोडत असेल, तर बॉलर त्याला रन आऊट करू शकतो. अशा प्रकारे आऊट करणं खेळ भावनेविरोधात नसल्याचं एमसीसीने स्पष्ट केलं आहे. याआधी अशाप्रकारे आऊट करणं खेळ भावनेविरोधात होतं. एमसीसीने बनवलेला हा नियम यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपासून (T20 World Cup) लागू होणार आहे. एमसीसीने बदललेल्या या नियमांमुळे ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) नाराज झाला आहे. हा खेळ भावनेशी जोडला गेलेला मुद्दा असल्याचं अजूनही वॉर्नरला वाटतं, पण दुसरीकडे यामध्ये चूक बॅटरचीच असल्याचं वॉर्नर म्हणाला आहे. डेव्हिड वॉर्नर हा सध्या पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातली पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. आता दुसरी टेस्ट मॅच 12 मार्चपासून सुरू होणार आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टआधी वॉर्नर पत्रकारांशी बोलत होता. ‘खेळाचा इतिहास आपल्याला दाखवतो की हा खेळ भावनेशी जोडला गेलेला मुद्दा आहे. तुम्ही खेळाडूंकडून असं काही करण्याची अपेक्षा करत नाही. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये बॅटर बॉल टाकण्याआधीच क्रीजच्या बाहेर जात असल्याचं आपण जास्त वेळा पाहिलं आहे, पण त्याने क्रीजमध्येच राहिलं पाहिजे,’ असं वॉर्नर म्हणाला. ‘अशाप्रकारे तुम्ही जर रन आऊट होत असाल तर ही तुमचीच चूक आहे. बॉलरच्या हातातून जोपर्यंत बॉल सूटत नाही तोपर्यंत तुम्ही रन धाऊ शकत नाही, हे तुम्हाला आधीच सांगितलं गेलं आहे,’ अशी प्रतिक्रिया वॉर्नरने दिली. अशाप्रकारच्या रन आऊट होण्याला मांकडिंग म्हणतात. भारताचे दिग्गज ऑलराऊंडर वीनू मंकड यांनी 1947 साली दोन वेळा ऑस्ट्रेलियाचे ओपनर बिल ब्राऊन यांना अशापद्धतीने आऊट केलं होतं, त्यानंतर अशाप्रकारच्या आऊटला मांकडिंग म्हणलं जाऊ लागलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात