मुंबई, 15 सप्टेंबर : पाकिस्तानचे माजी कॅप्टन रमीझ राजा (Ramiz Raja) यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रमीझ राझा यांच्या नियुक्तीवर पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रझा यांनी अध्यक्षपद स्विकारल्यानंतर पहिल्यांदा जे भाषण केलं त्यामध्ये ते थोडे गोंधळल्यासारखे वाटले, असं मत अख्तरनं व्यक्त केलं आहे. पीसीबीच्या कारभाराचा कठोर टीकाकार म्हणून अख्तर ओळखला जातो.
क्रिकेट शो 'गेम ऑन है' या कार्यक्रमातील चर्चेत अख्तर बोलत होता. 'माझ्या मते रमीझ राजा भाषण करताना थोडे गोंधळलेले होते. बाबर आझमनं (Babar Azam) इम्रान खान (Imran Khan) यांचं अनुकरण करावं, अशी त्यांची इच्छा होती. त्याचबरोबर त्यांना कॅप्टनवर लक्ष ठेवायचं आहे. त्याची चौकशी करायची आहे. तसं केलं तर बाबर आझम मुक्तपणे कॅप्टनसी करु शकणार नाही.
मी जे पाहिलं त्यानुसार, रमीझ भाईचं बाबरबद्दलंच धोरण कडक असेल. त्यांनी कृपया बाबरला कॅप्टनसीवरुन हटवू नये अशी मी विनंती करतो,' असं अख्तर यावेळी म्हणाला. आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीमचा कॅप्टन म्हणून बाबर आझमची नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची पत्नी झाली रोहितची फॅन, टीम इंडियाला दिला गंभीर इशारा
शोएब अख्तरनं यापूर्वी टी 20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीमवरुन पीसीबीवर टीका केली होती. तो पुढे म्हणाला की, 'रमीझ भाईंचा उद्देश पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी चांगला आहे. पण त्यांनी शांत राहण्याची गरज आहे. मीडियानं त्यांच्यावर टीका केल्यास त्यांना जशास तसं उत्तर देणे ही भूमिका योग्य नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Babar azam, Pakistan, Shoaib akhtar