मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ashes Series: डेव्हिड वॉर्नर मैदानाबाहेरही सुपरहिट, फॅन्सचं जिंकलं मन! पाहा VIDEO

Ashes Series: डेव्हिड वॉर्नर मैदानाबाहेरही सुपरहिट, फॅन्सचं जिंकलं मन! पाहा VIDEO

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) दुसरी टेस्ट सध्या सुरू आहे. या टेस्टमध्ये डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) अनोखी कृती करत फॅन्सचं मन जिंकलं आहे.

  • Published by:  News18 Desk

अ‍ॅडलेड, 17 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) दुसरी टेस्ट सध्या सुरू आहे. अ‍ॅडलेडमध्ये सुरू असलेल्या या टेस्टचा पहिला दिवस डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) गाजवला. वॉर्नर टी20 वर्ल्ड कपपासून फॉर्मात आहे. अ‍ॅशेस सीरिजमध्येही त्याचा फॉर्म कायम आहे. अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवशी त्याने दमदार बॅटींग केली. वॉर्नर शतकाच्या बाबतीत मात्र दुर्दैवी ठरला. त्याचे शतक फक्त 5 रनने हुकले. त्यानंतरही वॉर्नरनं क्रिकेट फॅन्सचं मन मात्र जिंकलं आहे.

ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट लगेच गेल्यानंतर वॉर्नरनं लाबुशेनच्या मदतीनं इनिंग सावरली. त्याने 167 बॉलमध्ये 11 फोरसह 95 रन काढले. वॉर्नरला बेन स्टोक्सनं (Ben Stokes) आऊट केलं.  वॉर्नरनं आऊट झाल्यानंतर पॅव्हिलियनमध्ये जाताना त्याचे ग्लोज स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या लहान मुलाला भेट दिले. अगदी अनपेक्षित आणि थेट डेव्हिड वॉर्नरकडून मिळालेल्या या भेटीमुळे तो मुलगा एकदम भारावून गेला. वॉर्नरची ही कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

ऑस्ट्रेलियाला दुसरी टेस्ट सुरू होण्यापूर्वीच एक मोठा धक्का बसला. टेस्ट टीमचा कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) आऊट झाला आहे. कमिन्स बुधवारी रात्री हॉटेलमध्ये कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे उघड झाले. त्यामुळे तो दुसऱ्या टेस्टमधून आऊट झाला. कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे. तब्बल तीन वर्षांनी ऑस्ट्रेलियन टीमची कॅप्टनसी करणाऱ्या स्मिथनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला.

कोरोनामुळे आणखी एका सीरिजचा बळी, वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार

ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 2 आऊट 221 रन केले. मार्नस लाबुशेन शतकाच्या उंबरठ्यावर असून तो 95 रनवर नाबाद आहे. तर स्टीव्ह स्मिथ  18 रनवर त्याला साथ देत आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियानं 9 विकेट्सनं जिंकली आहे.

First published:

Tags: Ashes, David warner, Video Viral On Social Media