मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : भारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी पंतप्रधान नाराज, लवकरच टीममध्ये बदल होणार!

T20 World Cup : भारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी पंतप्रधान नाराज, लवकरच टीममध्ये बदल होणार!

टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे, पण या सामन्याआधीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) नाराज झाले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबरला होणार आहे, पण या सामन्याआधीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) नाराज झाले आहेत. इम्रान खान यांना पाकिस्तानची टीम आवडली नाही आणि याबाबत त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) यांच्याकडे आक्षेप नोंदवला आहे. इम्रान खान यांना पाकिस्तानच्या टीममध्ये दोन अनुभवी खेळाडू पाहिजे आहेत. शोएब मलिक (Shoaib Malik) आणि सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) यांना पाकिस्तानच्या टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही खेळाडूंना वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळू शकतं.

समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वर्ल्ड कप टीममध्ये बदल करण्याचे आदेश पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांना दिले आहेत. यानंतर रमीझ राजा यांनी इम्रान खान यांच्याकडे 3 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ मागितला आहे. तोपर्यंत पाकिस्तानच्या नॅशनल टी-20 कपचा पहिला राऊंड संपणार आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी 10 ऑक्टोबरपर्यंत टीममध्ये बदल करण्याची परवानगी आहे.

पाकिस्तानच्या टीममध्ये आझम खान, ऑलराऊंडर खुशदिल शाह आणि मोहम्मद नवाज, मोहम्मद हसनेन आणि शोएब मकसूद यांना संधी मिळाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मीडियानेही पाकिस्तानच्या निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती. आता हे सगळे खेळाडू नॅशनल टी-20 कपमध्ये अपयशी ठरत आहेत.

साऊदर्न पंजाबकडून खेळणाऱ्या आझम खानने 3 इनिंगमध्ये फक्त 35 रन केले आहेत. तर शोएब मकसूदला आतापर्यंत 42 रनच करता आल्या आहेत. खुशदिल शाहने 3 मॅचमध्ये 51 रन आणि डावखुरा फास्ट बॉलर मोहम्मद नवाजने 2 विकेट घेतल्या. मोहम्मद हसनैनला 4 मॅचमध्ये 2 विकेट मिळाल्या आहेत.

दुसरीकडे शोएब मलिकला टी-20 वर्ल्ड कपमध्ये निवडण्यात यावं, अशी मागणी सुरू आहे, पण तोदेखील खराब फॉर्ममध्ये आहे. शोएब मलिकने सीपीएल 2021 मध्ये 11 मॅचमध्ये फक्त 67 रन बनवले. मलिकची सरासरी 7.44 ची होती, त्यामुळे मलिकची निवड झाली तरी या निर्णयावरही टीका होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Imran khan, India vs Pakistan, T20 world cup