हरारे, 10 मे : पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (Pak vs ZIM) यांच्यात हरारेमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये पाकिस्तान विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हरारे टेस्टच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्ताननं पहिल्या इनिंगमध्ये 378 रनची मोठी आघाडी घेतली. झिम्बाब्वेवर फॉलो ऑन लादला. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही झिम्बाब्वेची पडझड झाली. दोन टेस्ट मॅचची ही मालिका 2-0 नं जिंकण्यासाठी पाकिस्तान फक्त 1 विकेट दूर आहे. पाकिस्तानच्या या सर्व चांगल्या कामगिरीला त्यांच्याच फास्ट बॉलरनं गालबोट लावलं.
काय घडला प्रकार?
पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) यानं भर मैदानात झिम्बाब्वेच्या ल्यूक जॉन्गवे (Luke Jongwe) याच्याशी वाद घातला. झिम्बाब्वेच्या दुसऱ्या इनिंगधील 49 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. त्या इनिंगमध्ये एकही विकेट न मिळालेल्या हसन अलीनं ल्यूकला मैदानातच चिथावलं. त्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला हा प्रकार घडला. त्यानंतर पुढच्याच बॉलला ल्यूकनं हसन अलीला फोर लगावला आणि माझं हे उत्तर असल्याचं इशारा करुन सांगितले.
ल्यूकनं उत्तर दिल्यानं हसन अलीचा राग अनावर झाला. तो ल्यूकच्या दिशेने पुढं आला. त्याला पाहून ल्यूक देखील आक्रमक झाला. दोघांमध्ये भर मैदानात वाद सुरु झाला. हे प्रकरण चिघळत असल्याचं लक्षात येताच मैदानातील अन्य खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांना एकमेकांपासून दूर नेले.
जीभ बाहेर काढून दाखवलं वाकडं
अन्य खेळाडूंच्या मध्यस्थीनंतरही हे प्रकरण शांत झालं नाही. हसन अली पुढचा बॉल टाकण्यासाठी आला तेंव्हा ल्यूकनं त्याला जाणीवपूर्वक थांबवलं. त्यामुळे हसन अलीला पुन्हा एकदा बॉल टाकायला जावं लागलं. त्यावेळी विकेट न मिळालेल्या हसननं बॉल टाकण्यापूर्वी ल्यूकला जीभ बाहेर काढून चिडवलं.
Hassan Ali vs Jongwe. I thought I'd seen it all There will only be 1 winner #ZIMvPAK pic.twitter.com/nxGh2W3tSS
— (@GodwillMamhiyo) May 9, 2021
हरारे टेस्टमध्ये झिम्बाब्वे पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. मात्र ल्यूक तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस 31 रन काढून नॉट आऊट होता.तर हसन अलीला दुसऱ्या इनिंगमध्ये संपूर्ण दिवसभर एकही विकेट मिळाली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.