जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / PAK vs NZ : सोशल मीडियावर भिडले दोन्ही देशांचे क्रिकेटपटू, हाफिजनं थट्टा करताच मिळालं चोख उत्तर

PAK vs NZ : सोशल मीडियावर भिडले दोन्ही देशांचे क्रिकेटपटू, हाफिजनं थट्टा करताच मिळालं चोख उत्तर

PAK vs NZ : सोशल मीडियावर भिडले दोन्ही देशांचे क्रिकेटपटू, हाफिजनं थट्टा करताच मिळालं चोख उत्तर

न्यूझीलंड क्रिकेट टीमनं अचानक पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यानंतर (New Zealand Cricket Team Cancelled Pakistan Tour) वाद सुरू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 सप्टेंबर: न्यूझीलंड क्रिकेट टीमनं अचानक पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यानंतर  (New Zealand Cricket Team Cancelled Pakistan Tour) वाद सुरू झाला आहे. पाकिस्तान सरकार, पीसीबी आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना हा निर्णय अजिबात आवडलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंडच्या टीमवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीयत. पाकिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद हाफिजनं (Mohammad Hafeez) ट्विटरवर या निर्णयावरुन न्यूझीलंडच्या खेळाडूंना टोला लगावला आहे. त्याला न्यूझीलंडच्या बॉलरनं उत्तर दिलं आहे. हाफीजनं न्यूझीलंड टीमचा इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं लिहलं आहे की, ‘सुरक्षा दलाचं धन्यवाद. ज्यांनी न्यूझीलंड क्रिकेट टीमला इस्लामाबाद विमानतळावर सुरक्षित पोहचवलं. एकच रस्ता, पहिल्यासारखी सुरक्षा तरीही आज धोका कसा नाही? याचं मला आश्चर्य वाटतं.’ हाफिजच्या या ट्विटला न्यूझीलंडचा फास्ट बॉलर मिचेल मॅकलेघननं उत्तर दिलं आहे. ‘पाकिस्तान दौरा रद्द करण्यासाठी न्यूझीलंड टीमला दोषी धरु नये,’ असं ट्विट मॅकलेघननं केलं. त्यानं हे ट्विट नंतर डिलिट केलं. पण तोपर्यंत सोशल मीडियावर ते व्हायरल झाले होते. IPL पूर्वी ख्रिस गेलनं पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यानं खळबळ, Tweet Viral मॅकलेघननं या ट्विटमध्ये दौरा रद्द केल्याबद्दल न्यूझीलंड सरकारला दोषी ठरवलं होतं. ‘दौरा रद्द करणे हे किती वाईट आहे हे मला माहिती आहे. पण यासाठी खेळाडू किंवा बोर्डाला दोषी मानू नका. दोष द्यायचाच असेल तर आमच्या सरकारला द्या. त्यांनी गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनुसार निर्णय घेतला. तरुण खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करायचं होतं, याची मला खात्री आहे. पण, त्यांच्याकडं दुसरा पर्याय नव्हता.’ असं ट्विट त्यानं केलं आहे.

News18

न्यूझीलंडची टीम पाकिस्तान दौऱ्यात रावळपिंडीमध्ये 3 वनडे आणि लाहोरमध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार होती, पण आता हा दौराच रद्द करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धची सीरिज वाचवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रयत्न केले. एवढच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आरडेर्न (New Zealand PM Jacinda Ardern) यांच्याशीही चर्चा केली, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात