मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

On This Day: शोएब अख्तरच्या 'बेईमानी'मुळे मैदानात राडा, स्वत: सचिनला शांत करावं लागलं प्रकरण

On This Day: शोएब अख्तरच्या 'बेईमानी'मुळे मैदानात राडा, स्वत: सचिनला शांत करावं लागलं प्रकरण

भारतासमोर चौथ्या डावात विजयासाठी 279 रन्सचे लक्ष्य होते. 43व्या षटकात 9 रन्सवर सचिन वादग्रस्त रनआउट (Sachin Tendulkar Run Out) झाला. खरं तर, क्रिझवर येण्यापूर्वीच शोएब अख्तरनं (Shoiab Akhatar) जाणूनबुजून सचिनला धक्का दिल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं

पुढे वाचा ...

कोलकाता, 19 फेब्रुवारी: भारतीयांचा सर्वांत आवडता खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट (Cricket). गल्ली गल्लीत क्रिकेटचा खेळ अगदी चुरशीनं खेळला जातो. भारतीय क्रिकेट टीमच्या मॅचेस असतात तेव्हा क्रिकेटप्रेमींचा उत्साह अगदी बघण्याजोगा असतो. त्यातही भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकीस्तानविरुद्ध (India vs Pakistan Cricket Match) मॅच असेल तर बघायलाच नको, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. जणू काही दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे, अशी भावना असते. क्रिकेटच्या मैदानावरही दोन्ही टीम्स जिंकण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत असतात. त्यामुळे खेळाडूंवरही वेगळाच ताण असतो. त्यातून काही वादाचे प्रसंगही उद्भवतात. काही वर्षांपूर्वी तर एका मॅचमध्ये पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूनं खेळताना केलेल्या 'बेईमानी'मुळे दंगल उसळण्याची वेळ आली होती. मात्र भारतीय क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (God of Cricket -Sachin Tendulkar) यानं पुढाकार घेत प्रेक्षकांना शांत केलं होतं. आज या घटनेला 23 वर्षं पूर्ण झाली आहेत, मात्र आजही क्रिकेट रसिकांच्या मनात ही आठवण घर करून आहे.

हे वाचा-ऑलिम्पिक स्पर्धेचे महत्त्वाचे सेशन मुंबईत, नीता अंबानी यांच्या प्रयत्नांना यश

19 फेब्रुवारी 1999 मध्ये कलकत्ता (आता कोलकाता Kolkata) इथल्या ईडन गार्डन मैदानावर (Eden Garden Stadium) भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई टेस्ट चॅम्पियनशिपसाठीची (Asian Test Championship) मॅच खेळली गेली होती. आशियाई कसोटी चॅम्पियनशिपची ही पहिली मॅच होती आणि वासिम अक्रम पाकिस्तानच्या टीमचा कॅप्टन होता.

भारतासमोर चौथ्या डावात विजयासाठी 279 रन्सचे लक्ष्य होते. 43व्या षटकात 9 रन्सवर सचिन वादग्रस्त रनआउट (Sachin Tendulkar Run Out) झाला. खरं तर, क्रिझवर येण्यापूर्वीच शोएब अख्तरनं (Shoiab Akhatar) जाणूनबुजून सचिनला धक्का दिल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. तरीही पाकिस्तानच्या अपीलवर थर्ड अंपायरनं (Third Umpire) सचिन रनआउट असल्याचा निर्णय दिला. हे बघून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला. त्यांनी या निर्णयाचा विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. मैदानावर बाटल्या आणि इतर वस्तू फेकण्यास सुरुवात केली. जोरजोरात घोषणा दिल्या जात होत्या. स्टेडियममध्ये एकच गोंधळ सुरू झाला. अखेर बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि स्वत: सचिननं पोलिसांसह मैदानात येऊन प्रेक्षकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र त्यानंतरही गोंधळ थांबत नव्हता. अखेर शेवटच्या दिवसाचा खेळ रिकाम्या स्टेडियममध्ये झाला. भारतानं ही मॅच 46 रन्सनी गमावली.

हे वाचा-गांगुलीच्या सल्ल्यानंतरही बदललं नाही 'लक', पुजाराची टीम इंडियातून हकालपट्टी अटळ

क्रिकेटच्या मैदानावरील घडणाऱ्या काही घटना ऐतिहासिक ठरतात. कधी खूप विचित्र शॉट्स खेळले जातात, तर कधी अप्रतिम फिल्डिंग केले जाते. कधी अतिशय कठीण असे कॅच घेतले जातात. वेगवेगळ्या बॉलिंग अ‍ॅक्शन्स पाहायला मिळतात, काही क्रिकेटर्सची विकेट घेतल्यावर सेलिब्रेशन करण्याची स्टाईल आगळीवेगळी असते. अशा अनेक गोष्टी संस्मरणीय ठरतात. त्यात खेळताना होणारे वादही असतात. अशाच एका गंभीर वादाची ही आठवण आज 23 वर्षांनतरही क्रिकेट रसिकांच्या मनात ताजी आहे.

First published:

Tags: India vs Pakistan, On this Day, Sachin tendulakar