अजिंक्यचं शतक चेतेश्वर पुजाराप्रमाणेच फॉर्मात नसलेल्या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) या मॅचमधील खेळाकडे सर्वांचं लक्ष होतं. अजिंक्यनं मुंबईकडून खेळताना शतक झळकावलं आहे. त्याने 290 बॉलमध्ये 17 फोर आणि 2 सिक्स यांच्या मदतीनं 129 रन काढले. अजिंक्यनं यावेळी सरफराज खानसोबत चौथ्या विकेटसाठी 252 रनची भागिदारी केली. Ranji : SRH च्या खेळाडूनं फक्त 68 बॉलमध्ये झळकावले शतक, 19 फोर आणि 2 सिक्सचा वर्षाव मुंबईकडून सरफराजनं सर्वाधिक 275 रन केले. त्याच्या खेळीमुळे मुंबईनं पहिली इनिंग 7 आऊट 544 रनवर घोषित केली. मुंबईच्या मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना सौराष्ट्राची सुरूवात खराब झाली. तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत त्यांचा स्कोअर 4 आऊट 126 असा होता. सौराष्ट्राची टीम अजून 418 रननं पिछाडीवर होती. उद्या (रविवार) या मॅचचा शेवटचा दिवस आहे.WICKET! Over: 25.3 C Pujara 0(4) lbw Mohit Avasthi, Saurashtra 62/4 #SAUvMUM #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 19, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, Pujara