मुंबई, 19 फेब्रुवारी : न्यूझीलंडनं पहिल्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा (New Zealand vs South Africa) एक इनिंग आणि 276 रननं दणदणीत पराभव केला आहे. ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या या टेस्टच्या तिसऱ्याच दिवशी यजमान टीमनं विजयावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग फक्त 95 रनवर संपुष्टात आली होती. त्यानंतर न्यूझीलंडनं 482 रन केले. आफ्रिकेची दुसरी इनिंगही 111 रनवर संपुष्टात आली. न्यूझीलंडनं तब्बल 18 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे. त्यामुळे हा विजय टीमसाठी खूप खास आहे. फास्ट बॉलर मॅट हेन्री (Matt Henry) या विजयाचा हिरो ठरला. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 7 विकेट्स घेत आफ्रिकेला बॅक फुटवर ढकलले होते. त्याच्या बॉलिंगमुळे आफ्रिकेची संपूर्ण टीम 95 रनवर ऑल आऊट झाली. त्यानंतर हेन्रीनं 11 व्या क्रमांकावर बॅटींगला येत 58 रन काढले. 11 व्या क्रमांकावर येऊन अर्धशतक आणि 7 विकेट्स घेणारा हेन्री हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
New Zealand beat South Africa by an innings and 276 runs to go 1-0 up in the two-match Test series 💪#NZvSA | #WTC23 pic.twitter.com/SvmhtSDHNb
— ICC (@ICC) February 19, 2022
न्यूझीलंडकडून दुसऱ्या इनिंगमध्ये अनुभवी बॉलर टीम साऊदीनं 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेण्याचा रिचर्ड हॅडली यांचा रेकॉर्ड साऊदीनं तोडला आहे. मॅच हेन्रीनं दुसऱ्या इनिंगमध्ये 2 विकेट्स घेतल्या. या विजयासह 2 टेस्टच्या या सीरिजमध्ये न्यूझीलंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या सीरिजमधील दुसरी आणि शेवटची टेस्ट 25 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे.

)







